• Download App
    कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; काँग्रेस पक्षाने हिजाबच्या बाजूने संसदेत मांडली भूमिका!!The hijab controversy in Karnataka has repercussions in Maharashtra

    कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; काँग्रेस पक्षाने हिजाबच्या बाजूने संसदेत मांडली भूमिका!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले असतानाच काँग्रेस पक्षाने केंद्रीय पातळीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार वर्तणूक करण्याचा अधिकार आहे. हिजाब घालणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे.The hijab controversy in Karnataka has repercussions in Maharashtra

    हिजाब बाबत काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट केल्यानंतर केंद्र सरकारने संसदेत या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

    – “पहले हिजाब, फिर किताब”; बीड मालेगाव मध्ये पडसाद!!

    कर्नाटकातील उडुपी मध्ये महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा गणवेशाऐवजी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला. या मुद्यावरून कर्नाटक राज्यात ठिकठिकाणी मोठा वाद उत्पन्न झाला आहे. हे प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेले आहे. हिचा परिधान करणे हा आमचा मूलभूत हक्क आहे, असा या मुस्लीम विद्यार्थिनींचा दावा आहे. येत्या तीन दिवसांमध्ये कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटकच्या सरकारने घेतला आहे.

    या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रातल्या बीड आणि मालेगाव या शहरांमध्ये उमटले आहेत. बीडमध्ये ठिकठिकाणी “पहले हिजाब, फिर किताब”, अशा आशयाची पोस्टर्स लागली आहेत. फारुकी लखमानी या विद्यार्थ्याने ही पोस्टर्स लावली आहेत. “हर किमती चीज पर्दे मे होती है”, असेही त्यावर लिहिण्यात आले आहे.

    एकीकडे बीडमध्ये ही पोस्टर्स लागली असताना त्याचबरोबर मालेगाव मध्ये काही मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले आहे. कर्नाटकात तिथल्या सरकारने तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हिजाब वादाचे पडसाद उमटल्यानंतर महाराष्ट्रातले विकास आघाडी सरकार कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    The hijab controversy in Karnataka has repercussions in Maharashtra

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे