वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे ताजमहाल घडविणाऱ्या कारागिरांचे हात तोडले गेले, तर दुसरीकडे काशी विश्वनाथ कॉरिडार घडविणाऱ्या कारागिरांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा सन्मान करण्यात आला, हाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतात बदल घडला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज काढले. The hands of the artisans of the Taj Mahal were broken, while the artisans of the Kashi Vishwanath Corridor were showered with flowers; Modi praised by Agriculture Minister
नैसर्गिक शेती संदर्भात गुजरातच्या आणंद मध्ये शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात कृषिमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे वर्णन केले. कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीच्या स्वरूपात एक क्रांतिकारक पाऊल टाकले जात आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत देशाच्या संसदेने संमत केलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले. परंतु, शेती सुधारणांचा मार्ग सोडलेला नाही. नैसर्गिक शेती ही शाश्वत शेती आहे. तिचा विकास आणि विस्तार हे सरकारचे धोरण आहे याकडे नरेंद्रसिंह तोमर यांनी लक्ष वेधले आहे.
The hands of the artisans of the Taj Mahal were broken, while the artisans of the Kashi Vishwanath Corridor were showered with flowers; Modi praised by Agriculture Minister
महत्त्वाच्या बातम्या
- वुहान लॅब लीकमुळेच कोरोना जगभरात पसरला, कॅनडाच्या बायोलॉजिस्टचा ब्रिटिश संसदेत दावा
- जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हिजबुलच्या दहशतवाद्याचा खातमा
- गुगल कंपनीने कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण केले बंधनकारक
- School Reopen : आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात
- क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज