प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६ नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / पादत्राणे काढणे आवश्यक नाही, असे सांगितले. The Governor’s statement of insulting the police martyrs is malicious and fraudulent.
- अलिकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते.
- त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
- आजच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केले.
राज्यपालांचा हुतात्म्यांना अभिवादन करताना फोटो काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील दुजोरा दिला होता. परंतु आता राजभवनातील या संदर्भात स्पष्ट खुलासा केला आहे.
The Governor’s statement of insulting the police martyrs is malicious and fraudulent.
महत्वाच्या बातम्या