• Download App
    आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, 5 दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर । The good news Corona healing pill arrived, 5 day course; How much does it cost and where will you buy it? Read detailed

    आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, ५ दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर

    Corona healing pill : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या 1 महिन्यात ओमिक्रॉनच्या 1700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. परिस्थिती बिकट असली तरी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आहे. कोविड-19 च्या उपचारात वापरण्यात येणारी मोलनुपिरावीर ही अँटीव्हायरल गोळी तत्काळ मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी भारतात लाँच करण्यात आली. Molnupiravir व्यतिरिक्त, Covovax आणि Corbevax लादेखील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने मान्यता दिली आहे. The good news Corona healing pill arrived, 5 day course; How much does it cost and where will you buy it? Read detailed


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या 1 महिन्यात ओमिक्रॉनच्या 1700 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. परिस्थिती बिकट असली तरी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी आहे. कोविड-19 च्या उपचारात वापरण्यात येणारी मोलनुपिरावीर ही अँटीव्हायरल गोळी तत्काळ मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी भारतात लाँच करण्यात आली. Molnupiravir व्यतिरिक्त, Covovax आणि Corbevax लादेखील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने मान्यता दिली आहे.

    अँटीव्हायरल मोलनुपिराविर

    कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारात मोलनुपिरावीरचा वापर केला जातो. हे एक पुनर्निर्मित औषध आहे, जे गोळीच्या आकारात दिले जाते. रुग्ण ते सहज घेऊ शकतात. ही गोळी शरीरात विषाणू पसरण्यापासून रोखते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. संक्रमित रुग्णाला 12 तासांच्या आत 4 गोळ्या घ्याव्या लागतील. उपचाराचा कोर्स म्हणजेच मोलनुपिरावीर गोळ्यांचा कोर्स 5 दिवसांचा आहे.

    या औषधाची किंमत किती?

    सोमवारी पूर्ण 5 दिवसांच्या कोर्ससह मोलनुपिरावीर 1399 रुपयांत मिळतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, मॅनकाइंड फार्माचे अध्यक्ष आरसी जुनेजा यांनी सांगितले की, हे औषध आतापर्यंतचे सर्वात स्वस्त अँटीव्हायरल औषध आहे, ज्याची एक टॅबलेट 35 रुपयांना उपलब्ध असेल आणि 5 दिवसांचा कोर्स 1399 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

    कुठून कराल खरेदी?

    मोलनुपिराविर या गोळ्या बाजारात सहज उपलब्ध होतील, असा विश्वास आहे. वास्तविक, मेडिकल स्टोअर्सवर विक्री करण्याची शिफारस करण्यात आली आहे, परंतु दुकानदारांना काही सूचनादेखील दिल्या जाऊ शकतात. हे औषध अशा रुग्णांसाठी वापरले जाईल जे गंभीर कोरोनाचे बळी आहेत आणि रुग्णालयात दाखल आहेत. पुढच्या काही दिवसांत मोलनुपिराविरचा ५ दिवसांचा कोर्स मेडिकल स्टोअरमध्ये मिळू शकेल, पण तो विकत घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. केंद्र सरकारने मोलनुपिराविरच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ते विक्रीसाठी नियंत्रित केले जाऊ शकते. हे औषध कोणीही मनाने विकत घेऊ शकत नाही. जोपर्यंत डॉक्टर रुग्णाला हे औषध लिहून देत नाहीत, तोपर्यंत ते विकत घेता येत नाही.

    हे औषध कसे कार्य करते?

    तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणू आपल्या शरीरात आरएनए यंत्रणेद्वारे दार ठोठावतो आणि संसर्ग पसरू लागतो. विषाणू आणि संसर्ग जसजसा पसरतो तसतसे रुग्णाची प्रकृती गंभीर बनते. मोलनुपिरावीर गोळ्या RNA यंत्रणा सुधारतात आणि विषाणू शरीरात पसरण्यापासून थांबवतात. जेव्हा औषधाचा प्रभाव सुरू होतो आणि व्हायरस कमकुवत होतो, तेव्हा रुग्णाची स्थिती सामान्य होते. गंभीर संसर्गापासून वाचतो.

    केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील सुमारे 13 फार्मास्युटिकल कंपन्या मोलनुपिरावीर देशांतर्गत बनवतील. या कंपन्यांमध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, नॅटको फार्मा, सिप्ला, स्ट्राइड्स, हेटेरो आणि ऑप्टिमस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. भारतात औषध निर्माण करणार्‍या १३ फार्मा कंपन्यांपैकी एक असलेल्या मॅनकाइंडने सांगितले आहे की, मोलनुपिरावीर कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरूद्धदेखील प्रभावी आहे.

    The good news Corona healing pill arrived, 5 day course; How much does it cost and where will you buy it? Read detailed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य