वृत्तसंस्था
सिंघू : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात जरी लॉकडाऊन लावला तरी कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार आहे, अशी अडेलतट्टू भूमिका भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टीकैत यांनी घेतली आहे. The farmers’ agitation will continue in the lockdown
टीकैत म्हणाले, गावातून आंदोलनासाठी आलेले शेतकरी येथेच राहणार आहेत. शुक्रवारी युपी गेट येथे ते बोलत होते. युपी गेट सिंघू आणि टिकरी सीमेवर पाच महिन्यापासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. 28 नोव्हेंबर 2020 पासून हे आंदोलन सुरु आहे.
दिल्लीतून उत्तर प्रदेशात वाहनांना जाण्यास मुभा
दिल्लीतून उत्तर प्रदेशात वाहनांना जाण्यास मुभा असून उत्तरप्रदेशातून दिल्लीला जाण्यास मनाई आहे. त्यासाठी युपी गेट रस्त्यावरील एक लेन सुरु ठेवली आहे. अन्य लेन या बंद आहेत. शेतकरी आंदोलनामुळे वाहनचलकाना मोठा त्रास होत आहे.
गेल्या पाच महिन्यापासून शेतकऱ्यांनी या परिसरात एक गावच वसविले आहे, असे सांगताना ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये माणस गाव कधी सोडतात का ? लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले जाईल. पण आंदोलन सुरूच राहील. त्याविरोधात स्थानिकांनी आंदोलन केले. पण टीकैत माघार घेण्यास तयार नसून त्यांच्या अडेलतट्टू भूमिकेवर देशभरातून टीका आता होऊ लागली आहे.