प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केल्यावर एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवारांना या शपथविधीची पूर्ण माहिती होती. कारण त्यांच्याशीच चर्चा झाली होती, असा स्पष्ट खुलासा केला.The early morning swearing-in ended President’s rule, understandable enough; Pawar’s “hat” to BJP!!
मात्र, देवेंद्र फडणवीस खोटे बोलतील, असे वाटले नव्हते असे वक्तव्य पवारांनी करून त्यांना खोटे पाडायचा प्रयत्न केला होता. पण आता या संदर्भात पवारांनी “समझनेवाले को इशारा काफी है”, असे सांगत आपणच भाजपला टोपी घातल्याची कबुली दिली आहे. चिंचवड मध्ये पोटनिवडणुकीसाठी आलेल्या पवारांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी समजणे वाले को इशारा काफी है, असे वक्तव्य केले.
पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्यातून एक फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
देशात जातीय तणाव वाढवायचा. हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा. आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करायची. तोडा आणि फोडा या ब्रिटीशांच्या नितीनुसार राज्य करायचे. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल, असा दावाही शरद पवारांनी केला.
The early morning swearing-in ended President’s rule, understandable enough; Pawar’s “hat” to BJP!!
महत्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींची टीका : म्हणाले- दिल्ली सर्वात बेशिस्त शहर, येथील लोक वाहतूक नियम पाळत नाहीत
- PM मोदी सांगणार रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याचा फॉर्म्युला : बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर पहिल्यांदाच रशिया, चीन, अमेरिकेचे मंत्री एकत्र येणार
- सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर
- राऊतांना “मनसे थेरपी” घेण्याचा सल्ला; अन्यथा पवार – पवार म्हणत रस्त्यावर फिरण्याची वेळ येण्याचा टोला!!