वृत्तसंस्था
चंडीगड : नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पंजाबमध्ये एक कॉमेडी शो बनली आहे, असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी सोडले आहे. The Congress, led by Navjot Singh Sidhu, is a comedy show; Tikastra of Harasimrat Kaur Badal
केंद्र सरकारच्या अनेक योजना पंजाबमध्ये काँग्रेसने लागू केल्या नाहीत. ज्या लागू होत्या, त्याचा डेटा केंद्राला पोहोचू दिला नाही. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात स्थगित केली पण त्यानंतर राज्य सरकारने जनतेला आरोग्यासाठी पैसा दिला नाही, अशी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री बदलले तरी त्यांच्यातली गटबाजी आणि भांडणे संपलेली नाहीत. ते काय आमच्याशी विधानसभा निवडणूकीत टक्कर घेणार. सिध्दूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कॉमेडी शो बनल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
बंगालमध्ये देखील अशीच स्थिती
पंजाबमध्ये काँग्रेस सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना स्थगित केली. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी आवश्यक डेटा केंद्र सरकारकडे पाठविलाच नाही. त्यामुळे बंगालमधले लाखो शेतकरी किसान सन्मान निधीपासून वंचित राहिले. असेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या बाबतीत झाले आहे.
The Congress, led by Navjot Singh Sidhu, is a comedy show; Tikastra of Harasimrat Kaur Badal
महत्त्वाच्या बातम्या
- IND vs PAK: महान सामन्यात हे पाच मोठे विक्रम होऊ शकतात, कोहली, रोहित आणि बुमराहलाही इतिहास रचण्याची संधी
- गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान ; म्हणाले – भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल
- १००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका