• Download App
    सरन्यायधिशांनी स्वत:च्या कोरोना आजाराचा संदर्भ देत सांगितले ओमिक्रॉन सायलेंट किलर|The chief justice referred to his own corona disease as Omicron Silent Killer

    सरन्यायधिशांनी स्वत:च्या कोरोना आजाराचा संदर्भ देत सांगितले ओमिक्रॉन सायलेंट किलर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: स्वत:च्या कोरोना आजाराचा संदर्भ देत ओमिक्रॉन हा छुपा मारेकरी (सायलेंट किलर) आहे. त्यातून बरे होण्यास दीर्घ कालावधी लागतो, असे मत देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी व्यक्त केले.The chief justice referred to his own corona disease as Omicron Silent Killer

    सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिवक्ता विकास सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर सरन्यायाधीशांनी हे मत मांडले. कोरोना बाधित रुग्णांमध्ये आता १५ हजारांची वाढ झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.



    ओमिक्रॉन हा सौम्य असल्याचे म्हणणे सिंग यांनी मांडले होते. त्यावर सरन्यायाधीशांनी स्वत:चेच उदाहरण दिले. ते म्हणाले, पहिल्या लाटेत आपल्याला बरे होण्यास चार दिवस लागले होते.

    परंतु तिसºया लाटेत बरे होण्यास याहून अधिक कालावधी लागत आहे.ओमिक्रॉन हा छुपा मारेकरी आहे. पहिल्या लाटेत मी चार दिवसांत बरा झालो होतो. परंतु या तिसºया लाटेत २५ दिवस उलटले तरी मी पूर्ण बरा झालेलो नाही.

    The chief justice referred to his own corona disease as Omicron Silent Killer

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले