केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सीबीआय आता कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारी ‘पिंजऱ्यातील पोपट’ राहिलेली नाही. ते म्हणाले की, आता सर्वात मोठी गुन्हेगारी तपास यंत्रणा आपले कर्तव्य पार पाडत आहे. “एक वेळ होती जेव्हा लोक म्हणायचे की सत्ताधारी पक्ष सीबीआयचा वापर करतात. काही अधिकाऱ्यांमुळे अडचण आली होती, पण आता ते अधिकारी नाहीत.The Chief Justice had questioned the CBI Kiren Rijiju said now the investigation system is not a parrot in a cage
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सीबीआय आता कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारी ‘पिंजऱ्यातील पोपट’ राहिलेली नाही. ते म्हणाले की, आता सर्वात मोठी गुन्हेगारी तपास यंत्रणा आपले कर्तव्य पार पाडत आहे. “एक वेळ होती जेव्हा लोक म्हणायचे की सत्ताधारी पक्ष सीबीआयचा वापर करतात. काही अधिकाऱ्यांमुळे अडचण आली होती, पण आता ते अधिकारी नाहीत.
रविवारी एका ट्विटमध्ये किरेन रिजिजू म्हणाले, सीबीआय आता पिंजऱ्यातला पोपट राहिलेला नाही. भारतातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ती आपली कर्तव्ये पार पाडते. सीबीआय अधिकाऱ्यांच्या पहिल्या कॉन्फरन्सचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. ते म्हणाले, आज जे पंतप्रधान आहेत, ते स्वत: भ्रष्टाचार निर्मूलनात मोठी भूमिका बजावत आहेत.”
1 एप्रिल रोजी डीपी कोहली मेमोरियल लेक्चरमध्ये सरन्यायाधीश एव्ही रमणा म्हणाले होते की, सीबीआयच्या विश्वासार्हतेवर काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. काही प्रकरणांमध्ये, कालांतराने सीबीआयच्या कारवाई किंवा निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व तपास यंत्रणांना एका छताखाली आणण्यासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करावी, असेही ते म्हणाले होते.
रिजिजू म्हणाले, मला आठवते की, एकेकाळी सत्तेतील प्रत्येक व्यक्ती तपासात अडचणी निर्माण करत असे. सत्तेत भ्रष्टाचार झाला की लोक खूप अस्वस्थ होत. सीबीआयला स्वतंत्र तपास करणेही अवघड झाले होते. मात्र, त्याला बराच काळ लोटला आहे..
The Chief Justice had questioned the CBI Kiren Rijiju said now the investigation system is not a parrot in a cage
महत्त्वाच्या बातम्या
- पुलवामा मध्ये अतिरेक्यांचा दोघांवर गोळीबार
- Raj Thackeray : हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना राज ठाकरेंचे भाषण झोंबले; नारायण राणे यांचे टोले
- Neighbours in Crisis : भारताचे शेजारी पाकिस्तान – श्रीलंका अस्थिरतेच्या गर्तेत; इम्रान आक्रमक पण राजपक्षेंचा राजीनामा!!
- Raj Thackeray : राज ठाकरेंच्या गुढीपाडवा भाषणाचे लळित संपेना; अजितदादा, सुजात आंबेडकरही विरोध उतरले विरोधात!!