…म्हणून माझ्या सहकाऱ्यांना मी रोज “दोगुना Lagaan देना पडेगा..” असं म्हणत असल्याचंही राजदूत एलिस यांनी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतातील ब्रिटीश राजदूत अॅलेक्स एलिस यांना आपली हिंदी सुधारायची आहे. त्यांनी लोकांना अशा काही चित्रपटांची नावे सुचवण्यास सांगितले जेणेकरुन त्यांची हिंदी सुधारता येईल. यासाठी त्याने आपल्या शॉर्टलिस्ट केलेल्या काही चित्रपटांची यादी ट्विटरवर शेअर केली, पण इथे त्याने चूक केली. The British Ambassador Alex Ellis wrote Chole instead of Sholay and the users took the opportunity
एलिस यांनी आपल्या यादीत तीन चित्रपटांची नावे दिली. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा उल्लेख शोले असा होता, पण त्यांच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली आणि शोले ऐवजी ‘छोले’ झाला. बस्स, संधी मिळताच ट्विटर यूजर्स एन्जॉय करू लागले. तर काही लोकांनी त्यांना योग्य नावही सांगितले.
याउलट, अनेक युजर्स त्यांना विचारू लागले की, ते छोले-कुल्चे म्हणताय का? अनेकांनी त्यांना शोले पाहण्यासोबत चणे खाण्याचा सल्ला दिला. ब्रिटिश राजदूतांना चूक लक्षात आल्यावर त्यांनी काही वेळाने पुन्हा ट्विट केले. मात्र, यावेळी आपली चूक सुधारत त्यांनी हिंदीत ‘शोले’ लिहून अजून नाश्ता केला नसल्याचे गंमतीने सांगितले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना शोले चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. यावर तुमचे मत काय आहे?
राजदूतांनी सोशल मीडियावर लोकांचे मत जाणून घेताच सल्ल्यांचा सूर उमटला. काही लोकांनी राजदूतांना रंग दे बसंती, आरआरआर, लगान, अमर अकबर अँथनी असे सर्व जुने चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. ते कोणता चित्रपट पाहणार आणि कोणता नाही हे एलिस यांनी सांगितले नाही. तर, गँग्स ऑफ वासेपूरबाबत एलिस म्हणाले की, मला हिंसा आवडत नाही. तर, एलिसने सांगितले हे देखील सांगितले की, मी ‘लगान’ चित्रपट पाहिला आहे. म्हणूनच मी माझ्या सहकाऱ्यांना रोज सांगतो, ‘दुगना लगान देना पडेगा’.
The British Ambassador Alex Ellis wrote Chole instead of Sholay and the users took the opportunity
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी – तृणमूळ – कम्युनिस्ट : संकुचित दृष्टी, आकुंचित पक्ष; राष्ट्रीय दर्जापासून ढळले नेतृत्व!!
- कर्नाटक भाजपकडून स्टार कँपेनर्सच्या डिमांडमध्ये योगी, जयशंकर, हेमंत विश्वशर्मा टॉपवर; जयशंकर तर सरप्राईज एलिमेंट!!
- पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते
- मुलींसाठी वरदान ठरलेल्या सुकन्या समृद्धी योजनेतून अधिक लाभ मिळणार; मोदी सरकारने वाढवला व्याज दर!