वागातोर येथे ते माध्यमांशी बोलतना प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला ड्रग्जमुक्त करणे हा माझा ध्येय आहे.The biggest drug raids in the state happened during my tenure,” he said. Claim of Pramod Sawant
विशेष प्रतिनिधी
गोवा : गोव्यात विशेषतः किनारी भागांत ड्रग्जचा व्यवसाय फोफावला असून यासंदर्भात शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी हल्लीच मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले होते. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की , राज्यातील मोठे ड्रग्जचे छापे हे माझ्याच कारर्किदीत पडल्याचा दावा करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, माझ्या कार्यकाळात ड्रग्समधील गुंतलेल्यांना आता अटक होऊ लागली आहे.अनेक छोट्या-मोठ्या ड्रग्ज पेडर्लसना पोलिसांनी तुरुंगात डांबले आहे.
गोव्याला ड्रग्जमुक्त करणे माझे ध्येय
वागातोर येथे ते माध्यमांशी बोलतना प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला ड्रग्जमुक्त करणे हा माझा ध्येय आहे. याशिवाय या बेकायदा व्यवहाराबाहेरील सर्व चांगल्या पर्यटनाचे आम्ही स्वागत करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.जो पाचलाख चौरस मीटर जागेत लाखो जमावाच्या उपस्थितीत सनबर्न महोत्सव व्हायचा, तो यावर्षी होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. .