• Download App
    मोठी बातमी : व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करता येणार नाही ; जाणून घ्या कारण । The big news: Photos and videos cannot be shared on Twitter without the consent of the person; Know the reason

    मोठी बातमी : व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर करता येणार नाही ; जाणून घ्या कारण

    • नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणं हा आहे. The big news: Photos and videos cannot be shared on Twitter without the consent of the person; Know the reason

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपण सर्वजण सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म वापरत असतो. यामध्ये मग आपण ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यांसारख्या ॲपचा वापर करतो.दरम्यान ट्विटरच्या खासगी धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. व्यक्तीच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येणार नाहीत.नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्संना सुरक्षा देणं हा आहे.

    आपण पाहिलं की आतापर्यंत कोणताही युजर्स दुसऱ्या युजर्सचे व्हिडिओ आणि फोटो त्याच्या परवानगीशिवाय पाठवू शकत होता. मात्र आता तसं करता येणार नाही. ट्विटरचा हा नियम पब्लिक फीगर नसलेल्या व्यक्तींसाठीच आहे. मात्र पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तींना ही सुविधा मिळणार नाही असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

    ट्विटरने सांगितलं आहे की , “खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं संभाव्य उल्लंघन होऊ शकतं. त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानी देखील होऊ शकते . तसेच गैरवापर केल्याने खासकरून महिला आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. ”

    The big news : Photos and videos cannot be shared on Twitter without the consent of the person; Know the reason

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य