विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील प्रमुख सट्टा बाजारांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच पूर्ण बहुमताने निवडून येणार असल्याचा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. भाजपावर ३०० कोटी रुपयांचा सट्टा लागला आहे.The betting market also trusts the Yogi, in Uttar Pradesh the BJP has a bet of Rs 300 crore
संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात सातही टप्प्यांतील मतदान पुर्ण झाले आहे. आता 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. युपीसह पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात कोणाचे सरकार येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून एक्झिट पोलही जाहीर होत आहे. सट्टा बाजारात मात्र उत्तर प्रदेशात योगी सरकारच येईल,
असा विश्वास व्यक्त होत असून त्यामुळे भाजपचा भाव चांगलाच वाढला आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, युपीत भाजपनंतर समाजवादी पक्ष हा दुसरा सर्वात मोठा पक्ष असेल. काँग्रेसला मात्र पाचही राज्यांच्या निकालात सर्वात कमी भाव मिळत आहे. युपीत कोणाची सत्ता येणार यावरून संपुर्ण बाजारात एकूण 300 कोटींहून अधिक रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे.
राजस्थानातील फलौदी सट्टा बाजारमध्ये युपीत भाजपला 223 ते 230 जागा देण्यात आल्या आहेत. सपाला 135 ते 145 जागा देण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सट्टा बाजारमध्ये भाजपला 220 ते 226 जागा देण्यात आल्या आहेत. सपाला 135 ते 140 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पद्धतीने इतर राज्यातील सट्टा बाजारातही भाजपचे कमळच फुललेले दिसत आहे. सर्वच सट्टा बाजारात काँग्रेसला फार कमी जागा देण्यात आल्या आहेत.
सट्टा चालवणारे सट्ट्याचे भाव जाहीर करण्यापुर्वी ज्या-ज्या राज्यांत निवडणूका आहे, त्या सर्व राज्यांचा सर्व्हे करतात. त्या राज्यातील राजकीय घडामोडी, निकालावर परिणाम करणारे घटक, या सर्वांची माहिती सट्टे चालवणाºयांडे असते. त्यानुसारच ते कोणत्या पक्षाला किती भाव द्यायचा हे ठरवतात.
जानेवारीमध्ये युपी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सट्टा मालकांनी कोणत्याही पक्षाबाबत स्पष्ट मत दिले नव्हते. जसजसे निवडणुकीचा प्रचार सुरू झाला व तो प्रचार पुढे जाऊ लागला, तसतसे पक्षांचे भाव ठरवण्यात आले. आता सातही टप्प्यांतील मतदान पुर्ण झाल्यानंतर सट्टा बाजाराने पराभव व विजयाबाबतची बोली लावणे सुरू केले आहे.
सट्टा बाजारात भाजप 223 ते 230 जागा जिंकू शकतो का, यावर सध्या सट्टा लावला जात आहे. या दोन आकड्यापैकी कोणत्याही एका आकड्यावर हो किंवा नाही, अशी बोली तुम्हाला लावाली लागती. सध्या या सट्ट्याचा भाव 1.20 आहे. समजा तुम्ही 223 या आकड्यावर हो म्हणून बोली लावली आणि निकालात भाजपने या आकड्यांना स्पर्श केला किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या तर तुम्हाला २०० रुपयांचा फायदा होईल आणि भाजपने तेवढ्या जागा जिंकल्या नाहीत, तर तुमचे सर्व पैसे जातील.
सट्टा बाजाराचा उत्तर प्रदेशातील अंदाज
- राजस्थान (फलौदी) सट्टा बाजार
पक्ष जागा
भाजप 223-230
सपा 135-145
काँग्रेस –
बसप 20-25
गुजरातचा सट्टा बाजार
पक्ष जागा
भाजप 223-230
सपा 135-145
काँग्रेस 2-3
बसप 20-25
मुंबईचा सट्टा बाजार
पक्ष जागा
भाजप 210-218
सपा 120-123
काँग्रेस 2-3
बसप 55-59
मध्य प्रदेशचा सट्टा बाजार
पक्ष जागा
भाजप 215-227
सपा 140-143
काँग्रेस 3-5
बसप 20-28
दिल्लीचा सट्टाबाजार
पक्ष जागा
भाजप 219-223
सपा 125-132
काँग्रेस 3-5
The betting market also trusts the Yogi, in Uttar Pradesh the BJP has a bet of Rs 300 crore
महत्त्वाच्या बातम्या
- Exit Poll : उत्तर प्रदेशासह 5 राज्यात चर्चा महिलांच्या status voting ची आणि तरुणांच्या class voting ची…!!
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक
- Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये जय भाजपा तय भाजपा ! डबल इंजिन सरकार … मोदी-योगी सरकार..
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??