• Download App
    पंतप्रधान किसान योजनेची रक्कम होणार दुप्पट, दोन हजार नव्हे तर तीन महिन्याला मिळणार चार हजार रुपये|The amount of Prime Minister's Kisan Yojana will be doubled, not two thousand but four thousand rupees in three months

    पंतप्रधान किसान योजनेची रक्कम होणार दुप्पट, दोन हजार नव्हे तर तीन महिन्याला मिळणार चार हजार रुपये

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान योजनेतील रक्कम दुप्पट होणार आहे. आता शेतकऱ्यांना दर तीन महिन्याला दोन नव्हे तर चार हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे वार्षिक रक्कम ही बारा हजार रुपये होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये मिळतात.The amount of Prime Minister’s Kisan Yojana will be doubled, not two thousand but four thousand rupees in three months

    आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये हंस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे.



     

    सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील आणि तरी देखील आधीचा हप्ता मिळाला नसेल तर ते अजूनही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकतात.

    याकरता 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला नोंदणीकरावी लागेल. अर्ज स्विकार झाल्यास ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील.

    The amount of Prime Minister’s Kisan Yojana will be doubled, not two thousand but four thousand rupees in three months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!