• Download App
    मंत्री कोणाला करायचे असा आम आदमी पक्षापुढे पेच, १७ जणांनाच मिळणार संधी|The Aam Aadmi Party is facing a dilemma as to who should be the Minister, only 17 people will get the opportunity

    मंत्री कोणाला करायचे असा आम आदमी पक्षापुढे पेच, १७ जणांनाच मिळणार संधी

    विशेष प्रतिनिधी

    मोहाली : पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, आता मंत्री कोणाला करायचे असा प्रश्न आपपुढे निर्माण झाला आहे. केवळ १७ जणांनाच मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.The Aam Aadmi Party is facing a dilemma as to who should be the Minister, only 17 people will get the opportunity

    पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या मोठ्या विजयानंतर आता ‘आप’चे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. भगवंत मान १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र, शपथविधी सोहळ्यापूर्वी भगवंत मान १३ मार्चला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड-शो करणार आहेत, अशी माहिती आहे.



    विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भगवंत मान यांनी आमदारांना संबोधित केले. अहंकार करू नका, ज्यांनी मतदान केले नाही त्यांचीही कामे करा. तुम्ही पंजाब्यांचे आमदार आहात, सरकार पंजाबींचे बनले आहे, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे असे ते आमदारांना म्हणाले.

    जिंकून आलो म्हणून चंदीगडला या, असे म्हणून चालणार नाही. कुठलाही भेदभाव करू नका, हा अरविंद केजरीवाल यांचाही संदेश आहे. शाळा, रुग्णालय, वीज, उद्योग, आपण १७ मंत्री करू शकतो, उर्वरित ७५ जणांना मंत्री केले जाणार नाही. रागावू नका, मंत्रिपदाचे काम प्रत्येकाने करायचे आहे’, असे मान म्हणाले.

    भगवंत मान यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. यादरम्यान भगवंत मान हे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतले.

    The Aam Aadmi Party is facing a dilemma as to who should be the Minister, only 17 people will get the opportunity

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!