• Download App
    ‘अल कायदाचा दहशतवादी डॉक्टर शबीलचा कोरोनाच्या मदतीसाठी न्यायालयात अर्ज |Terrorist wants to act as a doctor

    ‘अल कायदाचा दहशतवादी डॉक्टर शबीलचा कोरोनाच्या मदतीसाठी न्यायालयात अर्ज

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाकाळात मदत करण्यास परवानगी देण्यासाठी ‘अल कायदा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी शबील अहमद याने त्याने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. अहमद हा पेशाने डॉक्टर आहे.Terrorist wants to act as a doctor

    ‘अल कायदा या दहशतवादी संघटनेचे काम करीत असलेल्या शबील अहमदला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २२ फेब्रुवारीला अटक केली. ‘अल कायदा’च्या भारतातील आणि विदेशातील अन्य सदस्यांना अर्थ व अन्य मदत पुरवीत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे



    तसेच ब्रिटनमधील ग्लास्गो विमानतळावर ३० जून २००७ रोजी झालेल्या आत्मंघाती दहशतवादी हल्ल्यातील तो आरोपी आहे.वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याचा अनुभव आणि कौशल्य याचा उपयोग तिहारमध्ये पसरलेला कोरोना आणि कोरोनाबाधित कैद्यांवरील उपचारासाठी होऊ शकेल,

    असे त्याने न्यायालयात म्हटले आहे. सध्या तिहार तुरांगातही मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला आहे. शबील हा एमबीबीएस डॉक्टर असून गंभीर आजारावर उपचार करण्याचा त्याला सात वर्षांचा अनुभव आहे.

    Terrorist wants to act as a doctor

    Related posts

    Nirav Modi : फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते; युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

    Microsoft : मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

    राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!