विशेष प्रतिनिधी
जम्मू – जम्मू आणि काश्मिरमध्ये पूंच जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्करे तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. अबू जरारा असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानातील आहे.Terrorist killed in J and K
या दहशतवाद्याला पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते. त्याला राजौरी-पूंच परिसरात हल्ले घडविण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचा खातमा केल्याने दहशतवादविरोधी मोहिमेत दलाला मोठे यश मिळाले. यावर्षी ठार झालेला हा आठवा दहशतवादी आहे.
बेहरामगला परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर, दलाने या परिसराला वेढा घालून शोधमोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी दलावर गोळीबार करत पलायन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात या दहशतवाद्याचा मृत्यू झाला.
सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एके ४७ रायफल, चार काडतुसे, ग्रेनेड आणि भारतीय चलन जप्त केले. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून राजौरी-पूंच भागात अशा प्रकारची कारवाई सातत्याने केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Terrorist killed in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रम्होस क्षेपणास्त्र आता थेट चीन सीमेवर पोहोचू शकणार, चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
- निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप
- चरणजीत सिंग चन्नी आता केवळ नाईट वॉचमन, सिध्दूंना कॉँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष केल्यावर कॅ. अमरिंदर सिंग यांची टीका
- जातीनिहाय जनगणना अहवालात इतर मागासवर्गीयांचा समावेश नव्हता, त्रुटी असल्यानेच सादर केला नसल्याचे केंद्राचे न्यायालयात स्पष्टीकरण