विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : जम्मूतील हवाई दलाच्या विमान तळावर दोन ड्रोन हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता असून याकडे जागतिक समुदायाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले.Terrorist increases drone use
गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांनी आमसभेत सांगितले की, ‘‘सध्या सोशल मीडियासह विविध प्रकारच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचा दहशतवादी कारवायांसाठी, कट्टरतावाद पसरविण्यासाठी आणि युवकांची दिशाभूल करण्यासाठी वापर केला जात आहे.
आर्थिक व्यवहारांसाठीच्या नव्या डिजीटल माध्यमांचाही गैरवापर वाढला आहे. या सर्वांमध्ये आता ड्रोनद्वारे हल्ला करण्याची पद्धत वाढण्याची शक्यता आहे. ही बाब सर्वच देशांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ड्रोन बाजारात अत्यंत कमी दरांत आणि सहज उपलब्ध होत असल्याने दहशतवाद्यांकडून त्यांचा वापर वाढू शकतो.
जम्मूत झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अधिक सावध झालेल्या भारतीय लष्कराने दोन संभाव्य ड्रोन हल्ले परतवून टाकले. पाकिस्तानमधील दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे यामुळे दिसून आले आहे.
Terrorist increases drone use
महत्त्वाच्या बातम्या
- कोट्यवधी भारतीयांचा नारा जय हिंद द्रुमुकला मात्र खटकतोय, राज्यपालांच्या अभिभाषणातूनच वगळून टाकला, फुटिरतावादाची बिजे असल्याचा विरोधकांचा आरोप
- पब, डिस्को, बार चालतात मग गणेशोत्सव का नाही? आशिष शेलारांचा सवाल
- शरद पवार – उध्दव ठाकरे वर्षावर “सौहार्दपूर्ण” चर्चा; पण विधानसभा अध्यक्ष निवडणूकीत शिवसेना – काँग्रेस यांना एकत्रित धडा शिकविण्याची तयारी…??
- नवीन आयटी नियम पाळावेच लागतील; फेसबुक-गुगलला संसदीय समितीने बजावले