Ostrava Open : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी या मोसमातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीची फायनल जिंकून आपले खाते उघडले. सानियाने तिची चिनी जोडीदार शुई झांगसह हे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सानिया आणि झांग या द्वितीय क्रमांकाच्या जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टियन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ या तिसऱ्या मानांकित अमेरिकन जोडीविरुद्ध 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी या मोसमातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीची फायनल जिंकून आपले खाते उघडले. सानियाने तिची चिनी जोडीदार शुई झांगसह हे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सानिया आणि झांग या द्वितीय क्रमांकाच्या जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टियन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ या तिसऱ्या मानांकित अमेरिकन जोडीविरुद्ध 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला.
या मोसमात सानियाने दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महिन्यापूर्वी सानियाने अमेरिकेतील तिची जोडीदार चिर्स्टिना मचालेसह डब्ल्यूटीए 250 क्लीव्हलँड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सानिया आणि तिच्या जोडीदाराला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
20 महिन्यांनंतर सानियाचे जेतेपद
34 वर्षीय सानिया मिर्झाने 20 महिन्यांनंतर डब्ल्यूटीए जेतेपद पटकावले आहे. तिने जानेवारी 2020 मध्ये होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. रविवारी ओस्ट्रावा ओपनमधील विजयासह सानियाच्या डबल्स चॅम्पियनचा आकडा 43 वर पोहोचला आहे.
सानिया आणि झांगने जपानच्या इरी होझुमी आणि मकोतो निनोमिया या चौथ्या मानांकित जोडीला ऑस्ट्रावा ओपनच्या उपांत्य फेरीत 6-2, 7-5 ने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानात हायटेक चिटिंगचा प्रकार उघड, चपलेत बसवले गॅजेट, 25 परीक्षार्थींना दीड कोटीत झाली विक्री, कॉपी बहाद्दरांसह टोळी गजाआड
- सुप्रीम कोर्टाने NEET SS एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केल्यावरून केंद्र, NBE आणि वैद्यकीय परिषदेला फटकारले
- Bhawanipur By-polls : बंगालमध्ये तृणमूलचा पुन्हा हिंसाचार, भवानीपूरमध्ये भाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर तृणमूलच्या गुंडांचा हल्ला
- राज्यसभेसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची आसाममधून, तर सेल्वागणबथी यांची पुदुचेरीतून बिनविरोध निवड
- Dombivali Gang Rape : डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक, आतापर्यंत 33 पैकी 32 नराधम जेरबंद