• Download App
    कर्नाटकात धार्मिक स्थळे, मनोरंजन पार्क खुले, कोरोनाचे निर्बंध शिथील|Temples opens in Karnataka

    कर्नाटकात धार्मिक स्थळे, मनोरंजन पार्क खुले, कोरोनाचे निर्बंध शिथील

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – कोविड-१९ निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील. करमणूक पार्क व तत्सम जागा पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.Temples opens in Karnataka

    सरकारच्या आदेशानुसार कोविड-१९ ची मार्गसूची आणि आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मनोरंजन पार्क, खेळाची केंद्रे आणि तत्सम ठिकाणे पुन्हा खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, जलक्रीडा आणि पाण्याशी संबंधित साहसी क्रीडांना परवानगी नाही.



    उपासना स्थळे (मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आणि इतर धार्मिक स्थळे) उघडण्याची परवानगी आहे आणि उपासना स्थळांशी संबंधित कार्यक्रमांना २५ जुलैपासून परवानगी आहे. सण, मिरवणुका आणि मेळावे यांना परवानगी नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले.

    Temples opens in Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज