वृत्तसंस्था
जम्मू : एरवी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जबरदस्त तोंडसुख घेणारे नेते राजकारणात हिंदुत्व केंद्रस्थानी आल्यानंतर आपणच हिंदुत्ववाद्यांपेक्षा कसे हिंदुत्ववादी जास्त आहोत हे दाखवण्यासाठी टेम्पल रन करू लागले आहेत. Temple run of Mehbooba Mufti, who always takes pleasure in BJP’s Hindutva
राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या टेम्पल रन पाठोपाठ जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी देखील टेम्पल रन सुरू केला आहे. त्यांनी जम्मूतील पुंछमधील नवग्रह मंदिरात जाऊन शिव पिंडीला जलाभिषेक केला. मात्र, हे करताना त्या भाजपवर नेहमीप्रमाणे तोंडसुख घ्यायला विसरल्या नाहीत. भाजप नेहमी हिंदुत्वाचा डंका पिटतो. पण याच भाजपने अमरनाथ यात्रेकरूंसाठी कधी जमीन उपलब्ध करून दिली नव्हती. ती जमीन पीडीपी सरकारने उपलब्ध करून दिली, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला.
वास्तविक 370 कलम म्हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रशासनाने अमरनाथ यात्रेकरूंसाठी जमीन उपलब्ध करून देऊन तेथे दोन मोठी होस्टेल्स उभी केली आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे आणि मेहबूबा मुफ्तींनी संबंधित जागा पीडीपी सरकारने दिल्याचा दावा केला आहे.
पण हिंदुत्वाचा मुद्दा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर टेम्पल रन करणाऱ्या मेहबूबा मुक्ती या एकमेव नेत्या नाहीत. राहुल गांधी, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, केसीआर चंद्रशेखर राव हे सगळे टेम्पल रनच्या मागे आहेतच. पण महाराष्ट्रात देखील पुरोगामी म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या बारामती मतदारसंघातही विविध ठिकाणी टेम्पल रन करताना दिसल्या आहेत. मेहबूबा मुफ्तींचा नवग्रह मंदिरात जाऊन शिवाला केलेला जलाभिषेक अशाच प्रकारच्या टेम्पल रनचा एक भाग आहे.
Temple run of Mehbooba Mufti, who always takes pleasure in BJP’s Hindutva
महत्वाच्या बातम्या
- उत्तर कोरियाने पुन्हा डागले लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, लक्ष्यावर आदळण्यापूर्वी केले 1,000 किमी उड्डाण
- खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले
- शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट
- राष्ट्रवादीची छुपी चाल; उद्धवना हळूच बाजूला सार!!