• Download App
    तेजस्वी यादव - चिराग पासवान यांच्या भेटीची पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा Tejaswi yadav – chirag paswan meet in patana

    तेजस्वी यादव – चिराग पासवान यांच्या भेटीची पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव व लोकजनशक्ती पक्षाचे (एलजेपी) खासदार चिराग पासवान यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. Tejaswi yadav – chirag paswan meet in patana
    ‘एलजेपी’चे दिवंगत अध्यक्ष रामविलास पासवान यांचे वर्षश्राद्ध रविवारी (ता. १२) आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी चिराग पासवान यांनी बुधवारी तेजस्वी यांची भेट घेतली. या दोन्ही युवा नेत्यांच्या भेटीने ते भविष्यात एकत्र येण्याचे भाकीत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहे. पण ही भेट कौटुंबिक असल्याचे व दोघांच्या वडिलांच्या संबंधांवर यात चर्चा झाल्याचे तेजस्वी व चिराग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    ‘आरजेडी’ आणि ‘एलजेपी’ या दोन्ही पक्षात सध्या कौंटुबिक वाद सुरू असताना या दोन युवा नेत्यांची भेट झाल्याने चिराग पासवान हे लालू प्रसाद यांच्या गटात सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता, ‘आम्ही दोघांनी एकत्र यावे, अशी इच्छा लालू प्रसाद यादव यांनीच व्यक्त केल्याने, आता माझ्याीकडे सांगायला वेगळे काहीही नाही,’ अशी मिश्कीील टिपण्णी तेजस्वी यादव यांनी केली. त्यावेळी चिराग पासवान यांनीही स्मितहास्य केले.

    Tejaswi yadav – chirag paswan meet in patana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के