• Download App
    Tauktae Cyclone: अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार;बार्ज P305 जहाजावरील तब्बल २२ जणांचे मृतदेह हाती ; ५३ बेपत्ता Tauktae Cyclone: ​​Rescue operation in the Arabian Sea; 22 dead bodies on board the Barge P305; 53 missing

    Tauktae Cyclone: अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार;बार्ज P305 जहाजावरील तब्बल २२ जणांचे मृतदेह हाती ; ५३ बेपत्ता

    • तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा गेले दोन दिवस कोकण किनारपट्टी आणि मुंबईला बसला. यावेळी वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या बोटीतील खलाशांची भारतीय नौदलाच्या जवानांनी सुटका केली.

    • मुंबईजवळ सुमद्रात एक बोट वादळात अडकली, ज्यात २७३ जण होते. त्यापैकी १८४ जणांना नौदलाने सुखरूप वाचवले आहे .Tauktae Cyclone: ​​Rescue operation in the Arabian Sea; 22 dead bodies on board the Barge P305; 53 missing

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: तौक्ते या चक्रीवादळाने विध्वंसक रूप धारण करत महाराष्ट्र गुजरात गोवा इ.राज्यांना नुकसान पोहचवले. १७ मे रोजी मुंबईजवळील अरबी समुद्रात तोक्तेनं थैमान घातलं. याच वादळात बार्ज P305 (Barge P305) हे भलं मोठं जहाज अडकलं होतं. ज्यामध्ये तब्बल २७३ क्रू मेंबर आणि कामगार काम करत होते. यापैकी १८४ जणांची भारतीय नौदलाने मोठ्या कठीण परिस्थितीतून सुटका केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या जहाजावरील २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

    आतापर्यंत नौदलाच्या हाती २२ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्यापही ५३ जण बेपत्ता असून सध्या नौदलाकडून त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाच्या वेगवेगळ्या तुकड्या या शोध मोहिमांसाठी कार्यरत आहेत.

    आपल्या बचावकार्यादरम्यान, नौदलाने सांगितलं की, एक मोठी नौका (Barge P305)ही वादळादरम्यान, भर मध्य समुद्रात अडकली होती. ज्यामध्ये २७३ जण होते. त्यातील १८४ जणांना वाचविण्यात आलं आहे.

    भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची (INS Kochi) आणि आयएनएस कोलकाता (INS Kolkata) या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या (Ahilya) आणि ओशन एनर्जी (Ocean Energy) या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याशिवाय, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी GAL Constructor बार्जवर अडकलेल्या १३४ कर्मचाऱ्यांचीही सहीसलामत सुटका केली.

    ११ तास समुद्राच्या पाण्यात नौदल ठरले देवदूत 

    INS कोचीवरुन १२५ जणांना समुद्र किनारी आणण्यात आले. तर ६५ जणांना इतर जहाजांद्वारे आणलं जात आहे. अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन अद्यापही सुरुच आहे. बार्ज पी – 305 वरील काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. एक रात्र आणि एक दिवस पाण्यात राहिलेल्या या कर्मचाऱ्यांना वाचवण्यातही तटरक्षक दलाला यश मिळालं.

    “बार्ज बुडत होते, म्हणून मला समुद्रात उडी मारावी लागली. मी ११ तास समुद्रात होतो. त्यानंतर नेव्हीने आम्हाला वाचवले” असे क्रू मेंबर अमित कुमार कुशवाहा यांनी सांगितले.

    नौदलाला आतापर्यंत एकूण ३४ मृतदेह सापडले

    मुंबईतील खोल समुद्रात जेव्हा चक्रीवादळ पोहचलं त्यावेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जहाजांवर अनेक लोक अडकले असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून भारतीय नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तीन जहाजांवर एकूण ६९५ लोक अडकले होते. ज्यापैकी ६१९ जणांना वाचविण्यात यश आलं असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित लोकांचा अद्यापही शोध सुरुच आहे.

    AFCONS या ONGC साठी काम करणाऱ्या कंपनीने जारी केलं पत्रक

    AFCONS या ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंपनीने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आमची कंपनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काम करते आहे. गेल्या पाच दशकातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ आम्ही पाहिलं आहे या चक्रीवादळात Pappa 305 अर्थात P 305 ही बार्ज बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. चार्टर्ड बार्ज P 305 M/s Durmast Enterprises Limited यांचं होतं तेथील क्रू मेंबर आणि खलाशीही याच कंपनीचे होते. सोमवारी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि समुद्र खवळला तेव्हा P 305 मध्ये २६१ जण होते.

    या सगळ्यांनी बार्ज बुडण्यापूर्वी लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षासंबंधी उपकरणं घालून समुद्रात उड्या मारल्या. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांनी P 305 मधील १८४ जणांची सुखरूप सुटका केली आहे. जे कर्मचारी बेपत्ता आहेत त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी नौदल आणि भारतीय तटरक्षक दल झटतं आहे. बाधित झालेल्या इतर बार्जवरचे कर्मचारी सुखरूप आहेत. जे कर्मचारी समुद्रात बेपत्ता झाले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती कठीण आहे.. मात्र आमच्या सद्भवना आणि प्रार्थना या त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.

    Tauktae Cyclone: ​​Rescue operation in the Arabian Sea; 22 dead bodies on board the Barge P305; 53 missing

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!