• Download App
    काश्मिरात निष्पापांच्या हत्येची परराष्ट्र खात्यानेही घेतली दाखल, तर LG सिन्हा म्हणाले, दहशतवाद्यांवर लवकर व्हावी कारवाई । Target Killing in Kashmir Know What mea spokesperson arindam bagchi and LG Manoj Sinha Said

    काश्मिरात निष्पापांच्या हत्येची परराष्ट्र खात्यानेही घेतली दखल, तर LG सिन्हा म्हणाले, दहशतवाद्यांचा लवकरच होणार हिशेब चुकता!

    Target Killing in Kashmir : काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांवर भारताने पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांची हत्या केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे. MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, दहशतवादी काश्मीरमधील लोकांना लक्ष्य करत आहेत. ते म्हणाले की, काश्मीरमधील हिंसाचाराची घटना निंदनीय आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा चिंतेचा विषय आहे. काश्मीरमध्ये निर्दोषांना लक्ष्य केले जात आहे. Target Killing in Kashmir Know What mea spokesperson arindam bagchi and LG Manoj Sinha Said


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांवर भारताने पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांची हत्या केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने संताप व्यक्त केला आहे. MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, दहशतवादी काश्मीरमधील लोकांना लक्ष्य करत आहेत. ते म्हणाले की, काश्मीरमधील हिंसाचाराची घटना निंदनीय आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा चिंतेचा विषय आहे. काश्मीरमध्ये निर्दोषांना लक्ष्य केले जात आहे.

    काय म्हणाले नायब राज्यपाल सिन्हा?

    दुसरीकडे, केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, गेल्या 48 तासांत एकापाठोपाठ 5 हत्या झाल्या. दहशतवाद्यांवर लवकरच मोठी कारवाई होईल. लवकरच न्याय मिळेल.

    सातत्याने होणाऱ्या हत्यांवर मनोज सिन्हा म्हणाले की, काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्यांना जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर लवकरच कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, जम्मू -काश्मीरमधील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि सुरक्षा दलांना अतिरेक्यांशी त्वरित सामना करण्यास सांगण्यात आले आहे. हे सुरक्षा यंत्रणांचे अपयश आहे का, या प्रश्नावर सिन्हा म्हणाले की, “होय, आम्ही त्याची जबाबदारी घेतो आणि ते आमचे अपयश आहे.”

    5 दिवसांत 7 नागरिकांचा बळी

    श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांची भ्याड कृत्ये सुरूच आहेत. दहशतवादी आता आपली दहशत दाखवण्यासाठी सामान्य लोकांचा बळी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे बळी जात आहेत. दहशतवाद्यांनी गुरुवारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी गेल्या 5 दिवसांत 7 नागरिकांचा बळी घेतला आहे.

    याआधी मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी 3 सामान्य लोकांना ठार केले होते. मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी सुमोचे अध्यक्ष नायदखाय मोहम्मद शफी उर्फ ​​सोनू यांची बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन परिसरात हत्या केली. त्यानंतर इक्बाल पार्कजवळ बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पाणीपुरी विकणाऱ्या एका रस्त्यावरच्या विक्रेत्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

    Target Killing in Kashmir Know What mea spokesperson arindam bagchi and LG Manoj Sinha Said

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले