• Download App
    तब्बल २५ वर्षानंतर तामीळनाडूच्या महिला मंत्र्याला भ्रष्टाचाराचा आरोपावरून पाच वर्षे शिक्षाTamil Nadu woman minister sentenced to five years for corruption after 25 years

    तब्बल २५ वर्षानंतर तामीळनाडूच्या महिला मंत्र्याला भ्रष्टाचाराचा आरोपावरून पाच वर्षे शिक्षा

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मंत्री इंदिरा कुमारी आणि त्यांचे पती बाबू यांना तब्बल २५ वर्षांनंतर पैशांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इंदिरा कुमारी आणि त्यांचे पती बाबू यांच्यावर या प्रकरणी १९९६ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Tamil Nadu woman minister sentenced to five years for corruption after 25 years

    विशेष न्यायालयाने २५ वर्षांनंतर या प्रकरणी निकाल सुनावला आहे. न्यायालयाने निकाल देताना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर माजी मंत्री इंदिरा कुमारी यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी २००४ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र हा खटला सुमारे १७ वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन एलिसिया यांनी बुधवारी या प्रकरणात निकाल सुनावला.आरोपी इंदिरा कुमारी ह्या समाज कल्याण मंत्री असताना त्यांच्यावर सरकारी पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

    इंदिरा कुमारी या १९९१ ते १९९६ या काळात जयललितांच्या नेतृत्वाखाली एआयएडीएमके सत्तेवर असताना समाजकल्याणमंत्री होत्या. त्यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित ट्रस्टच्या नावावर जनतेकडून पैसे उकळून त्यांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अखेर २५ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागून माजी मंत्री आणि त्यांच्या पतीला शिक्षा झाली आहे.

    Tamil Nadu woman minister sentenced to five years for corruption after 25 years

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते