Tamil Nadu Legislative Assembly : तामिळनाडूच्या एमके स्टालिन सरकारने आज विधानसभेत कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. प्रस्तावानुसार, केंद्राला शेतीशी संबंधित तीनही कायदे मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, यादरम्यान विधानसभेत मोठा गदारोळ झाला. Tamil Nadu Legislative Assembly passes resolution against Farm laws, CM mk stalin says all cases filed against the farmers will be withdrawn
वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूच्या एमके स्टालिन सरकारने आज विधानसभेत कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. प्रस्तावानुसार, केंद्राला शेतीशी संबंधित तीनही कायदे मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, यादरम्यान विधानसभेत मोठा गदारोळ झाला.
तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री एम.के. स्टालिन म्हणाले, “गेल्या एक वर्षात केंद्र सरकारच्या तीन शेतकरी-संबंधित कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर नोंदवलेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील.”
भाजप-अण्णाद्रमुकचा वॉकआउट
या दरम्यान, भाजप आणि AIADMK च्या आमदारांनी विधानसभेतून वॉकआऊट केले, कृषी कायद्यांच्या विरोधातील प्रस्तावाचा त्यांनी निषेध केला. भाजप आणि अण्णाद्रमुकने आरोप केला की, कायद्यांविरोधातील ठराव घाईने आणण्यात आला. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून शेतकऱ्यांचे मत मागवायला हवे होते.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि दिल्ली-पंजाब सीमेवर तळ ठोकून आहेत. यादरम्यान सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत, परंतु आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकारचे तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
Tamil Nadu Legislative Assembly passes resolution against Farm laws, CM mk stalin says all cases filed against the farmers will be withdrawn
महत्त्वाच्या बातम्या
- Coal Scam Case : कोळसा घोटाळ्यात तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला ED ने बजावले समन्स
- अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, परिणामाची चर्चा कधी करत नाही, नाशकात संजय राऊतांचा राणेंवर निशाणा
- झटपट श्रीमंत बनण्याच्या नादात तरुणांचे कृत्य, 78 एसी चोरून भाजीपाल्यासारखे रस्त्यावर विकले, पाच जणांना अटक
- BH Series Registration Mark : वाहनांना मिळणार नवीन BH रजिस्ट्रेशन मार्क, ट्रान्सफरची प्रोसेसची होणार खूप सोपी
- KBC 13 First Crorepati : सीझनची पहिली ‘करोडपती’ ठरली हिमानी बुंदेला, यशासाठी 10 वर्षे केले प्रयत्न