• Download App
    तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा! Tamil Nadu ED raided the house of Minister V Senthil Balajis close relatives

    तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!

    16 लाखांहून अधिक किमतीच्या बेहिशेबी मौल्यवान वस्तू आणि 22 लाख रुपयांची रोकड जप्त

    विशेष प्रतिनिधी

    कोईम्बतूर : अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर छापे टाकले आहेत. यादरम्यान 16 लाखांहून अधिक किमतीच्या बेहिशेबी मौल्यवान वस्तू आणि 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.  Tamil Nadu ED raided the house of Minister V Senthil Balajis close relatives

    3 ऑगस्ट रोजी, राज्याच्या कोईम्बतूर आणि करूर जिल्ह्यातील व्ही. सेंथील बालाजी यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले, जे सध्या न्यायालयीन कोठडीत चेन्नईच्या पुझल मध्यवर्ती कारागृहात आहेत.

    व्ही. सेंथील बालाजी  हे एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत आहेत. राज्य परिवहन विभागातील नोकऱ्यांसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 14 जून रोजी त्यांना अटक केली होती.

    Tamil Nadu ED raided the house of Minister V Senthil Balajis close relatives

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा