• Download App
    तामिळनाडू : चर्च मधील फादर बेनेडिक्ट अँटो यास लैंगिक शोषणप्रकरणी अटक Tamil Nadu Church Priest Benedict arrested for sexual abuse

    तामिळनाडू : चर्च मधील फादर बेनेडिक्ट अँटो यास लैंगिक शोषणप्रकरणी अटक

      अनेक महिलांसोबतचे इंटिमेट व्हिडिओ सोशल मीडियावर लीक

    विशेष प्रतिनिधी

    तामिळनाडूतील एका चर्चेच्या पादरीला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. लैंगिक शोषणाची ही घटना अधिकच धक्कादायक आहे कारण रिपोर्ट्सनुसार पास्टर बेनेडिक्ट अँटोचे अनेक मुलींसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. Tamil Nadu Church Priest Benedict arrested for sexual abuse

    कन्याकुमारी जिल्ह्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याप्रकरणी फरार असलेला ३० वर्षीय सायरो मलंकारा कॅथलिक चर्चचा पादरी फादर बेनेडिक्ट अँटो याला २० मार्च रोजी तामिळनाडू पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. नागरकोइलमधील फार्महाऊस येथे तो लपला होता.

    PFI वर बंदी कायम, UAPA न्यायाधिकरणाने केंद्राचा निर्णय ठेवला कायम

    बेनेडिक्ट अँटोने अल्पवयीन मुलींनाही सोडले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  तो कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइल जवळील मार्तंडमचा रहिवासी आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरून हे देखील दिसून येते की तो NTK नेता सीमन उर्फ ​​सेबॅस्टियनचा समर्थक आहे, जो बंदी घातलेल्या LTTE चा समर्थक आहे.

    केरळ आणि तामिळनाडूमध्ये अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. सिस्टर अभयाचे प्रकरण वाचकांच्या स्मरणात असावे, सिस्टर अभयाच्या हत्येप्रकरणी फादर कुट्टूर आणि नन सेफीला दोषी ठरवण्यात आलं होतं.

    Tamil Nadu Church Priest Benedict arrested for sexual abuse

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली