• Download App
    Tamil nadu Assembly Election 2021 Result : कमल हासन दक्षिण कोयंबतूर जिंकणार का ?; डॉ. संतोष बाबू यांचा वेलाचेरीतील विजयाकडे लक्ष|Tamil nadu Assembly Election 2021 Result

    Tamil nadu Assembly Election 2021 Result : कमल हासन दक्षिण कोयंबतूर जिंकणार का ?; डॉ. संतोष बाबू यांचा वेलाचेरीतील विजयाकडे लक्ष

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल काही तासांत हाती येत आहेत. अभिनेता ते राजकारणी, असा असा प्रवास करणारा कमल हासन याचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष विधानसभेच्या 43 जागा लढवत आहे.Tamil nadu Assembly Election 2021 Result

    स्वतः प्रथमच त्याने दक्षिण कोयंबतूर या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.विशेष म्हणजे खुद्द कमल हासन याने दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी डॉ. संतोष बाबू यांनी वेलाचेरी मतदारसंघातून निवडणूक लढवली.



    या दोन जागा पक्षासाठी महत्वाच्या आणि हक्काच्या मानल्या जात आहे. तामिळनाडूच्या आयटी विभागाचे डॉ. संतोष बाबू हे माजी सचिव होते. या दोघांशिवाय व्ही पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे.  ते दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार होते.

    कमल हासन याने 21फेब्रुवारी 2018 मध्ये मदुराई येथे मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन केला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याने तमिळनाडूत 39 आणि पुडुचेरीतून 1 असे 40 उमेदवार लोकसभेला उभे केले. परंतु सर्व उमेदवार पराभूत झाले.

    लोकसभेत सपाटून मस्त खाल्ल्यानंतर आता त्याने विधानसभा निवडणूक लढवली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याने अभिनेते रजनीकांत यांच्याबरोबर संधान बांधले. एकत्र निवडणूक लढविण्याची योजना आखली.

    परंतु रजनीकांत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आणि राजकारणातून अंग बाजूला काढून घेतले. त्यामुळे कमल हासन यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवली आहे. कमल हासन, भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन आणि काँग्रेसचे मयुर जयकुमार यांच्यात तुल्यबळ लढत झाली.

    Tamil nadu Assembly Election 2021 Result

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य