• Download App
    अभिनेता कमल हासन याची दक्षिण कोयंबतूरमधून आघाडी Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates kamal hasan

    Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : अभिनेता कमल हासन याची दक्षिण कोयंबतूरमधून आघाडी

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी वेगाने सुरु आहे. अभिनेता ते राजकारणी, असा असा प्रवास करणाऱ्या कमल हासनने दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates kamal hasan

    कमल हासन यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष विधानसभेच्या 43 जागा लढवत आहे. विशेष म्हणजे खुद्द कमल हासन याने दक्षिण कोयंबतूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघातून कमल हासन याला भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन आणि काँग्रेसचे मयुर जयकुमार यांच्याशी तीव्र सामना करावा लागत आहे मतदार संघात तीन उमेदवार असल्याने ही तुल्यबळ लढत होत आहे.



    दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी डॉ. संतोष बाबू यांनी वेलाचेरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. दरम्यान,दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे सल्लागार व्ही. पोनराज यांना मक्कल निधी मय्यम पक्षाने उमेदवारी दिली आहे.

    कमल हासन याने 21फेब्रुवारी 2018 मध्ये मदुराई येथे मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन केला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याने तमिळनाडूत 39 आणि पुडुचेरीतून 1 असे 40 उमेदवार लोकसभेला उभे केले. परंतु सर्व उमेदवार पराभूत झाले.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू