Friday, 9 May 2025
  • Download App
    Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : तमिळनाडूमध्ये द्रमुकची विजयाकडे घोडदौड, पहिल्या दोन तासांत १२९ जागांवर आघाडी; अद्रमुक पिछाडीवर।Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates

    Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : तमिळनाडूमध्ये द्रमुकची विजयाकडे घोडदौड, पहिल्या दोन तासांत १२९ जागांवर आघाडी; अद्रमुक पिछाडीवर

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तमिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीने मतमोजणीनंतरच्या दोन तासांत राज्यात आधाडी घेतली आहे. द्रमुक आणि मित्रपक्ष 129 जागांवर आघाडीवर आहेत. तर प्रमुख विरोधी आणि सत्ताधारी एआएडीएमके आघाडी 98 जागांवर आघाडीवर होते. एकंदर मतदानाचा कौल पाहता राज्यात सत्तांतर अटळ असून द्रमुक सत्तेवर येत असल्याची चिन्हे आहेत. Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates



    राज्यात 234 विधानसभेच्या जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु होताच द्रमुक (डीएमके) – काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. सुरुवातीच्या दोन तासात द्रमुक आघाडीने 129 जागांवर आणि अद्रमुक आघाडीचे 98 उमेदवार आघाडीवर होते. कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम हा पक्ष एका जागेवर आघाडीवर होता. अर्थात मतमोजणीची प्रक्रिया पुढे जाईल त्या प्रमाणे मतमोजणीचे आकडे बदलणार आहेत. अजून एकही उमेदवार विजयी घोषित झाला नसला तरी मतदानाचा ट्रेंड मात्र द्रमुकच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

    Tamil nadu Assembly Election 2021 Result Live Updates

    महत्वाच्या  बातम्या

    Related posts

    Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील

    Operation Sindoor : फेक न्यूज पसरवायला, पाकिस्तान पाठोपाठ चीन देखील सरसावला!!

    राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार अन् सशस्त्र दलांसोबत उभा – आरएसएस