ब्लॅकमेलींगचा भीषण प्रकार बंगळुरूमध्ये उघड झाला आहे. एका रॅकेटमधील महिलेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया २५ वर्षीय तरुणाला फोन केला. व्हिडीओ कॉलवर त्याच्याशी गुलुगुलु बोलत कपडे काढायला लावले. नंतर त्याचाच व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. या प्रकाराला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.Talking on a video call, he was stripped naked and then blackmailed, 25-year-old commits suicide out of boredom
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : ब्लॅकमेलींगचा भीषण प्रकार बंगळुरूमध्ये उघड झाला आहे. एका रॅकेटमधील महिलेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया २५ वर्षीय तरुणाला फोन केला. व्हिडीओ कॉलवर त्याच्याशी गुलुगुलु बोलत कपडे काढायला लावले.
नंतर त्याचाच व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. या प्रकाराला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. याबाबतची माहिती अशी की स्पर्धा परीशंचा अभ्यास करण्यासाठी एक तरुण बंगळुरु येथे एकटाच राहत होता.
एका महिलेने त्याला सोशल मीडियावर फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठविली. या माध्यमातून दोघांची ओळख वाढली. एकमेंकांचा चेहराही पाहिला नसला तरी ते दोघे जीवलग मित्र बनले.
नंतर मात्र दोघांची मजल त्यापुृढे गेली. ते व्हॉटसअॅपवर व्हिडीओ कॉलही करू लागले. व्हिडीओ कॉलवर बोलताना महिलेने त्याला कपडे काढण्याची गळ घातली. त्यानेही प्रेमाने आपले सगळे कपडे काढले. या महिलेने त्याचे रेकॉर्डिंग करून घेतले.
त्यानंतर मात्र ही महिला गायब झाली. तिच्या गॅँगमधील इतरांनी व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तरुणाकडून पैशाची मागणी सुरू केली. या सगळ्याला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली.
मात्र, त्याच्या बहिणीला पूर्वीपासूनच संशय होता. तरुणाला अपरिचितांकडून सतत येत असलेले फोन आणि मेसेज यामुळे तिचा संशय वाढला होता. त्यामुळे आपल्या भावाने आत्महत्या केल्यावर तिने पोलीसांकडे तक्रार दिली. पोलीसांनी या गॅँगमधील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Talking on a video call, he was stripped naked and then blackmailed, 25-year-old commits suicide out of boredom
हे ही वाचा
- कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!
- महाराष्ट्र सरकारची ब्रेक द चेन नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश; सरकारी, खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले