• Download App
    काबुलमध्ये लवकरच दूतावास सुरू होण्याची तालिबान आशा, जागतिक मान्यतेसाठी अटापिटा|Taliban trying o get world support

    काबुलमध्ये लवकरच दूतावास सुरू होण्याची तालिबान आशा, जागतिक मान्यतेसाठी अटापिटा

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – काबूलमध्ये परदेशातील दूतावास पुढील वर्षापर्यंत सुरू होतील, असा विश्वा स तालिबानच्या शासकांनी व्यक्त केला आहे. तालिबानचे प्रवक्ते मोहंमद नईम यांनी म्हटले की, पुढील वर्षापर्यंत दूतावास सुरू होतील, पण ते कोणत्या देशाचे असतील, हे सांगू शकत नाही.Taliban trying o get world support

    तालिबानच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने तालिबानकडून पावले टाकण्यात येत असून दूतावास सुरू करणे हा त्याच्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. चालू आठवड्याच्या प्रारंभी अफगाणिस्तान व्यवहारसंबंधीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी थॉमस वेस्ट यांनी दोहा येथे तालिबान नेत्यांच्या आणि व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या.



    या चर्चेत अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून आणि अमेरिकेकडून करण्यात येणाऱ्या मदतीचा समावेश होता.काबूल शहरात १९६० च्या दशकात सुरू झालेले एरियाना चित्रपटगृहात आता शिट्या, टाळ्यांचा आवाज ऐकू येत नाही.

    गेल्या सहा दशकांपासून अफगाणिस्तानच्या नागरिकांचे मनोरंजन करणारे एरियाना तालिबानच्या राजवटीनंतर बंद पडले आहे. अफगाणिस्तानातील युद्ध, आशा-आकांक्षाचे आणि सांस्कृतिक बदलाचे साक्षीदार असलेले एरियानाच्या बाहेर असलेले हिंदी आणि अमेरिकी चित्रपटांचे पोस्टर्स काढून टाकले आहेत. दरवाजावर कुलूप लावले आहेत. एरियाना आणि अन्य चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश तालिबानने काढले आहेत.

    Taliban trying o get world support

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!