विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. EBP प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारने तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल ब्लेडिंग प्रोग्राम (EBP) हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘Sweet’ NEWS! Petrol again cheaper – financial support to sugar mills; Modi government took ‘this’ big decision …
पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलवरील जीएसटीत सरकारने 13 टक्क्यांची कपात केली आहे. सुधारित नियमानुसार जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते.
साखर कारखान्यात इथेनॉल-
साखर कारखान्यांमध्ये उपपदार्थाच्या स्वरुपात इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. भारतात उसाचे मोठे उत्पादन होते. उसाच्या रसापासून शिल्लक मळीवर प्रक्रिया करून इथिल व मिथिल अल्कोहोलची निर्मिती केली जाते. उत्पादित इथिल अल्कोहोलचा इथेनॉल म्हणून वापरता येते. उसाच्या रसापासून शिल्लक मळीवर प्रक्रिया करून इथिल व मिथिल अल्कोहोलची निर्मिती केली जाते. उत्पादित इथिल अल्कोहोलचा इथेनॉल म्हणून वापर करण्यात येतो. केंद्र सरकारने 2003 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय घेतला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे वाढते प्रमाण –
इथेनॉल पुरवठा वर्ष (ISY) 2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून त्यात ISY वर्ष 2020-21 मध्ये 350 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली आहे. सरकारने गेल्या महिन्यात उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमती पेट्रोलमध्ये 1.47 रुपयांनी वाढवल्या होत्या.
साखर कारखान्यांना आधार –
इथेनॉलच्या अधिक वापरामुळे पेट्रोलवरील भार कमी होण्याची आशा आहे. पेट्रोल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयातखर्चात देखील कपात करणे शक्य ठरेल. तसेच इथेनॉल निर्मितीमुळे देशातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक आधार उपलब्ध होईल .पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषणही कमी होते आणि शेतकऱ्यांना वेगळे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो.
‘Sweet’ NEWS! Petrol again cheaper – financial support to sugar mills; Modi government took ‘this’ big decision …
महत्त्वाच्या बातम्या
- ED ANIL DESHMUKH : अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणात ईडीने नोंदवला पुण्याच्या डीसीपींचा जबाब …
- 83 First Review Out : शानदार- जबरदस्त-जिंदाबाद ! टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण ; कबीर खान-रणवीर सिंगचा मास्टरपीस
- कर्नाटक सरकार धर्मांतरण रोखण्यासाठी करणार कडक कायदा, बळजबरीने धर्मांतर करणाऱ्यांना १० वर्षे शिक्षेचा प्रस्ताव
- Virat Kohli vs Dada : विराट कोहलीच्या वक्तव्यावर सौरव गांगुली म्हणाले – ‘नो कमेंट्स’…