वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन श्रम आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या बातमी बरोबरच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची बातमी ही माध्यमांनी दिली आहे. अखिलेश यादव यांनी त्यांचे स्वागत केल्याचे ट्विट केले आहे. Swami Prasad Maurya was welcomed by Akhilesh; But Maurya said, let’s decide after discussing with the supporters !!
परंतु, स्वतःला स्वामी प्रसाद मौर्य यांनी मात्र सावध भूमिका घेत आपण समर्थकांशी चर्चा करून कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे स्वतः अखिलेश यादव यांनी ट्विट करून ज्या नेत्याचे स्वागत केले, त्या स्वामी प्रसाद मौर्य यांनीच अखिलेश यादव यांना राजकीयदृष्ट्या धक्का दिल्याचे मानले जात आहे.
या खेरीज स्वामी प्रसाद मौर्य यांनी आणखी दावा केला आहे, की आपल्या बरोबरच लवकरच भाजप मधले किमान एक डझनभर आमदार राजीनामा देऊन बाहेर पडणार आहेत. परंतु अखिलेश यादव यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर आणि अखिलेश यादव यांनी मौर्य यांचे स्वागत केल्यानंतर देखील अद्याप त्यांची राजकीय भूमिका ठरली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार?, याची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थक आमदारांनी मध्ये देखील भाजपमधून राजीनामा देऊन बाहेर पडायचे की नाही याविषयी संभ्रम तयार झाला आहे.