यामुळे बांसुरी स्वराज यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश निश्चित झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांची भाजपा दिल्ली स्टेट लीगल सेलच्या राज्य सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश निश्चित झाला आहे. Sushma Swarajs daughter Bansuri Swaraj has been appointed as the state coconvenor of the BJP Delhi State Legal Cell
बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. भाजपाच्या दिल्ली युनिटचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बांसुरी यांची राज्य युनिटमधील त्यांच्या पहिल्या नियुक्तीमध्ये कायदेशीर सेलच्या सह-संयोजक म्हणून नियुक्ती केली. शुक्रवारी जारी केलेल्या पत्रात सचदेवा म्हणाले की, बांसुरी यांची नियुक्ती तत्काळ लागू होईल आणि त्या भाजपाला आणखी बळकट करतील अशी अपेक्षा आहे.
“एकतर इम्रान खान यांची हत्या होईल किंवा…” पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचे खळबळजनक विधान!
नियुक्तीनंतर बांसुरी यांनी सांगितले की, ‘’दिल्ली भाजपच्या कायदेशीर विभागाचा सह-संयोजक म्हणून मला औपचारिकपणे पक्षाची अधिक सक्रियपणे सेवा करण्याची संधी देण्यात आली आहे.”
बांसुरी यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले आहेत. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “भाजपा दिल्ली स्टेट लीगल सेलची राज्य सहसंयोजक म्हणून मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, बीएल संतोष, वीरेंद्र सचदेवा यांचे आभार मानू इच्छिते. मी भाजपचा अत्यंत ऋणी आहे.’’
भाजपच्या दिल्ली युनिटने दिलेल्या निवेदनानुसार, बांसुरी यांनी २००७ मध्ये दिल्लीच्या बार काउन्सीलमध्ये नोंदणी केली आणि त्यांना कायदेशीर व्यवसायात १६वर्षांचा अनुभव आहे.
Sushma Swarajs daughter Bansuri Swaraj has been appointed as the state coconvenor of the BJP Delhi State Legal Cell
महत्वाच्या बातम्या
- ‘नमो’ शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी नितीश कुमारांच्या मौनावर गिरीराज सिंह यांचा टोला, म्हणाले…
- राहुल गांधी हार्वर्ड – केंब्रिजचे पोस्ट ग्रॅज्युएट, पण त्यांना पप्पू बनविले; प्रियांका गांधींचा दावा; पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात डिग्रीचा उल्लेखही नाही
- अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची 28 मार्चला INS चिल्का युद्धनौकेवर पासिंग आऊट परेड