पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास 71 टक्के रेटिंगसह लोकप्रिय नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे मॉर्निंग कन्सल्टंट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या १३ जागतिक नेत्यांच्या यादीत ४३ टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना 43 टक्के रेटिंग मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाली आहे. Survey In terms of popularity, PM Modi is again ranked No 1 in the world by 71% people, Biden at No 6, list of 13 leaders announced
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास 71 टक्के रेटिंगसह लोकप्रिय नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे मॉर्निंग कन्सल्टंट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या १३ जागतिक नेत्यांच्या यादीत ४३ टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांचा क्रमांक लागतो, ज्यांना 43 टक्के रेटिंग मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना ४१ टक्के रेटिंग मिळाली आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही अव्वल स्थानावर आहेत. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.
13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे नवीनतम अप्रूव्हल रेटिंग निश्चित करण्यात आले आहे. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या सात दिवसांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित आहे. सर्वेक्षणात सामील असलेल्या लोकांची संख्या देशानुसार बदलते.
मे 2020 मध्येदेखील या वेबसाइटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च रेटिंग दिले होते. त्यावेळी, त्यांना 84 टक्के रेटिंग देण्यात आले होते, जे एका वर्षानंतर मे 2021 मध्ये 63 टक्के करण्यात आले.
Survey In terms of popularity, PM Modi is again ranked No 1 in the world by 71% people, Biden at No 6, list of 13 leaders announced
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, महात्मा गांधींच्या हत्येवरील नव्या चित्रपटावरून वादंग, आव्हाडांकडूनच आक्षेप, तर इतरांनी केली सारवासारव
- एसटीचे यांत्रिक कर्मचारी होणार वाहक आणि चालक; एसटी महामंडळाचा निर्णय
- मोठी बातमी : कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, IMFच्या मते 2024 पर्यंत उत्पादनात 12.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान
- नथुरामावरून ‘रामायण’ : नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब; पण मग…