विशेष प्रतिनिधी
सुरत : कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढू लागल्याने सुरतमधील विद्युतदाहिन्या रात्रंदिवस धडाडत आहेत. यामुळे त्यांच्या चिमण्या आणि लोखंडी चौकटी देखील उष्णतेमुळे वितळू लागल्या आहेत.Surat’s electricity was pounding day and night.
मागील आठवडाभरापासून येथील विद्युतदाहिन्या पेटलेल्या असून त्यांची देखभाल करणेही शक्य झाले नाही.साधारणपणे शहरामध्ये रोज १८ ते १९ लोकांचा मृत्यू होतो आहे. मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक होण्याआधी याच स्मशानभूमीमध्ये रोज वीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते.
आता रोज येथे शंभर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येऊ लागले आहेत.या स्मशानभूमीमध्ये सहा विद्युतदाहिन्या असून त्या चोवीस धडाडत असल्यामुळे त्यांचे तापमान सहाशे डिग्री सेल्सिअसवर पोचले होते. एवढ्या प्रचंड तापमानामध्ये चिमण्या आणि लोखंडी पेट्या टिकाव धरू शकत नाही. या मोडलेल्या वस्तूंची आता तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे.