प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर त्यांच्यावर चिंचवड मध्ये काही कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. मात्र चंद्रकांत दादांनी आधीच आपल्या वक्तव्यावरून माफी मागितल्याने त्यावर पडदा टाकला पाहिजे, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शाईफेक करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे वक्तव्य केले होते. Supriya Sule says, Shaifek is not the culture of Maharashtra
मात्र त्यांच्या त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने चंद्रकांत दादा पाटलांवर शाईफेक करणाऱ्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचे उघड झाले असून त्यापलिकडे देखील हे 51 हजारांचे बक्षीस हा नेता शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋषिकेश गायकवाड यांनी हे पारितोषिक कोपरा सभेत जाहीर केले होते. त्यानंतर चार-पाच तासांमध्येच चंद्रकांत दादा पाटलांवर पिंपरी चिंचवडच्या समता संघटनेचा कार्यकर्ता मनोज गरबडे याने काळी शाई फेकली. त्याबद्दल सोमेश्वर नगर मध्ये त्याचा जाहीर सत्कार करून 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असे गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
चंद्रकांतदादा पाटलांवर झालेल्या शाईफेक प्रकरणात राज्य सरकारने 11 पोलिसांना निलंबित केले आहे, तसेच मनोज गरबडे सह चार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्याचबरोबर त्याला 51 हजार रुपयांची पारितोषिक जाहीर करणाऱ्या ऋषिकेश गायकवाड यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Supriya Sule says, Shaifek is not the culture of Maharashtra
महत्वाच्या बातम्या