• Download App
    केरळमध्ये डाव्या आघाडीला पाठिंबा म्हणजे आपल्याच पायावर पायावर धोंडा पाडून घेणे, शशी थरुर यांचे स्पष्टीकरण|Supporting the Left Front in Kerala is like throwing stones at one's own feet, explains Shashi Tharoor

    शशी थरुर बरसले : केरळमध्ये डाव्यांना मत म्हणजे आपल्याच पायावर पायावर धोंडा पाडून घेणे!

    केरळमध्ये निवडणुकीचा ज्वर वाढत आहे त्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. राज्यातील डाव्या आघाडीला काही ठिकाणी कॉँग्रेसची संयुक्त आघाडी पाठिंबा देत आह, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर म्हणाले की, डाव्या आघाडीला पाठिंबा देणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे.Supporting the Left Front in Kerala is like throwing stones at one’s own feet, explains Shashi Tharoor


    विशेष प्रतिनिधी 

    तिरुअनंतपूरम : केरळमध्ये निवडणुकीचा ज्वर वाढत आहे त्याप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. राज्यातील डाव्या आघाडीला काही ठिकाणी कॉँग्रेसची संयुक्त आघाडी पाठिंबा देत आहे, असा आरोप भाजपकडून केला जात आहे.

    यावर कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर म्हणाले की, डाव्या आघाडीला पाठिंबा देणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे.शशी थरुर हे तिरुअनंतपूरम येथील खासदार आहेत.



    केरळमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत आहेत. ते म्हणाले, मी आत्तापर्यंत ५६ मतदारसंघात प्रचारासाठी गेलो आहे. प्रत्यक्ष जमीनीवरील वातावरण पाहिल्यावर बदल होणार असल्याचे दिसत आहे.

    कॉंग्रेसच्या लोकशाही आघाडी सरकारच्या बाजुने जनमत झुकूलागलेआहे. त्यामुळे कॉँग्रेसचा विजय निश्चित आहे, याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतीय जनता पक्षाने मेट्रोमॅन इ. श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करून आव्हान उभे केले आहे.

    याबाबत खासदार थरुर म्हणाले, भाजपा स्पर्धेतही नाही. केवळ पाच ते सहा जागांवर त्यांचे काहीसे आव्हान दिसत आहे.

    Supporting the Left Front in Kerala is like throwing stones at one’s own feet, explains Shashi Tharoor

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!