• Download App
    खासदार संघमित्रा मौर्य यांचे भाषण थांबविल्याने समर्थक संतप्त, योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच घोषणाबाजी|Supporters angry over the interruption of MP Sanghamitra Maurya's speech, shouting slogans in front of Yogi Adityanath

    खासदार संघमित्रा मौर्य यांचे भाषण थांबविल्याने समर्थक संतप्त, योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच घोषणाबाजी

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ :उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये मौर्य समाजाच्या मेळाव्यात खासदार संघमित्रा मौर्य यांचे भाषण थांबविल्याने समर्थक संतप्त झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरच घोषणाबाजी करण्यात आली.Supporters angry over the interruption of MP Sanghamitra Maurya’s speech, shouting slogans in front of Yogi Adityanath

    खासदार संघमित्रा मौर्य यांच्या भाषणावेळी झालेल्या एका प्रकारानंतर याठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी मौर्य यांच्या समर्थकांनी नाराज होत घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील यावेळी मंचावर उपस्थित होते.तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि बॅनरबाजी सुरूच ठेवली.



    मौर्य समाजाच्या सामाजिक प्रतिनिधी संमेलनावेळी बदायूंमधील खासदार संघमित्रा या मंचावर बोलण्यासाठी उभ्या होत्या. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना त्यांना मध्येच थांबवण्यात आले. यानंतर मंचावर शांतता पसरली. संघमित्रा या प्रकारामुळे नाराज होऊन आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या. मौर्य यांनी यावेळी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही,

    मात्र त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले. संघमित्रा यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव यांचे भाषण होते. मात्र, संघमित्रा यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे संघमित्रा झालेल्या प्रकारावरुन नाराज नसल्याचेही मंचावरून सांगण्यात आले; मात्र तरीही घोषणाबाजी सुरूच राहीली.

    कार्यक्रमामध्ये आलेल्या या व्यत्ययामुळे योगी आदित्यनाथ यांनी उठून संघमित्रा यांच्याकडे पाहिले. त्यानंतर संघमित्रा यांनी आल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, मी उच्च नेतृत्वावर किंवा समाजावर नाराज नाही. माज्या भाषणात व्यत्यय आणलेला मी सहन करत नाही, त्यामुळे मी शांत बसले.

    आपल्या समोर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष असे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. त्यामुळे आपण नियम पाळून शांत रहायला हवं. आपला समाज आतापर्यंत नियमांमध्ये राहूनच आपल्या हक्कांसाठी लढला आहे. या गोष्टीचा दाखला तुम्ही द्यायला हवा.

    Supporters angry over the interruption of MP Sanghamitra Maurya’s speech, shouting slogans in front of Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य