विशेष प्रतिनिधी
मुंबई : खरा शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, असा ऐतिहासिक निकाल देताना निवडणूक आयोगाने बहुसंख्य आमदार व खासदारांचा पाठिंबा हाच मुख्य घटक धरला आहे. यासंदर्भात आयोगाने दिलेल्या निकालात सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यातील मुद्दे पुढीलप्रमाणे : Support of majority MLA’s & MP’s proved decisive factor in favour of Eknath Shinde
- शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ तर ठाकरे यांच्याकडे पाच खासदार होते. ठाकरे गटाने सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात चार खासदारांनीच ठाकरेंना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
- शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण एक कोटी दोन लाख ४५ हजार १४३ मते मिळाली. खासदारांच्या पाठिंब्यानुसार शिंदे गटाकडे ७४ लाख ८८ हडार ६३४ मतांचा पाठिंबा असल्याचा निष्कर्ष असल्याचा आयोगाने काढला. त्या तुलनेत ठाकरे गटाकडे २७ लाख ५६ हजार ५०९ एवढीचे मते राहिली.
- आमदारांच्या संख्येबाबतही असेच निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५५ आमदार विजयी होऊन शिवसेनेला एकूण ४७ लाख ८२ हजार ४४० मते मिळाली. त्यातील ४० आमदार हे शिंदेकडे गेल्याने त्यांच्याकडे ३६ लाख ५७ हजार ३२७ मते राहिली. या तुलनेत ठाकरे गटाकडे १५ आमदारांची ११ लाख २५ हजार ११३ मते राहिली.
- दोन्ही गटांचे विविध फ्रंटियरचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांनी दिलेली प्रतिज्ञापत्रांतून पुरेसे बहुमत स्पष्ट होत नव्हते. तसेच प्रतिनिधी सभेतही कोणाकडे बहुमत याचा उलगडा होत नव्हता, अशी स्पष्ट नोंद आयोगाने केली आहे.
- विधीमंडळ पक्षातील फुटीवरून मूळ संघटनेतील फूट स्पष्टपणे लक्षात येत नसली तरी त्यावरून कल लक्षात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
Support of majority MLA’s & MP’s proved decisive factor in favour of Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
- घराणेशाहीच्या अंतावर निवडणूक आयोगाचे कायदेशीर शिक्कामोर्तब; शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!!
- ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
- जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने हात झटकले खरे, पण दोघांचेही मुद्दे सारखेच कसे??
- बीबीसीची डॉक्युमेंटरी मोदी विरोधी प्रपोगंडा आणि लांच्छनास्पद पत्रकारिता; कॉन्सर्वेटिव्ह ब्रिटिश खासदाराचाच हल्लाबोल