• Download App
    पंजाब काँग्रेसमध्ये नवा वाद : हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, पुतण्याने दिला राजीनामा । sunil jakhar tweets Objection on harish rawat statement Of Elections Under navjot singh sidhu Leadership on the day of charanjit singh channi oath ceremony

    शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…

    पंजाब काँग्रेसमधील वाद अद्याप शमलेला नाही. राज्य प्रभारी हरीश रावत यांनी नुकतेच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचे विधान केले आहे. यावर सुनील जाखड यांनी जाहीर आक्षेप नोंदवला आहे. सोमवारी चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यादरम्यान काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. sunil jakhar tweets Objection on harish rawat statement Of Elections Under navjot singh sidhu Leadership on the day of charanjit singh channi oath ceremony


    विशेष प्रतिनिधी

    चंदिगड : पंजाब काँग्रेसमधील वाद अद्याप शमलेला नाही. राज्य प्रभारी हरीश रावत यांनी नुकतेच नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार असल्याचे विधान केले आहे. यावर सुनील जाखड यांनी जाहीर आक्षेप नोंदवला आहे. सोमवारी चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यादरम्यान काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

    हरीश रावत यांच्या विधानावर काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी ट्वीट करून आक्षेप घेतला. सुनील जाखड यांनी लिहिले की, चरणजीत सिंह चन्नी यांच्या शपथेच्या दिवशी हरीश रावत यांनी केलेले विधान धक्कादायक आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री कमकुवत असल्याचे दर्शवणारे आहे. त्याच वेळी ते निवडीवरही प्रश्न उपस्थित करते.

    सुनील जाखड यांच्या पुतण्याचा राजीनामा

    हरीश रावत यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यावर सुनील जाखड यांनी आक्षेप घेतला. सुनील जाखड यांचे पुतणे अजयवीर जाखड यांनी पंजाब शेतकरी आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

    काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीश रावत म्हणाले होते की, पक्षाने चरणजीत सिंह चन्नीबाबत आधीच आपले मन तयार केले आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा कोण असेल हे काँग्रेस अध्यक्ष ठरवतील. जर आपण सद्य:परिस्थिती पाहिली तर यावेळी पंजाब सरकारचे मंत्रिमंडळ आणि प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल.

    जाखडही होते मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीत

    अखेरच्या दिवसापर्यंत सुनील जाखड यांचे नावही मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत होते आणि असे मानले जात होते की, हिंदू चेहरा असल्याने पक्ष त्यांना पसंती देऊ शकतो. पण बराच काथ्याकूट केल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव पुढे आले.

    सुनील जाखड यांच्या ट्विटबाबत पंजाब काँग्रेसमध्ये नवा वाद उफाळला आहे. काँग्रेस नेते हरमिंदर सिंग गिल म्हणतात की, चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा केंद्रीय हायकमांडचा निर्णय आहे, अशा स्थितीत ते (सुनील जाखड) ते काय म्हणाले यावर स्पष्टीकरण देतील.

    sunil jakhar tweets Objection on harish rawat statement Of Elections Under navjot singh sidhu Leadership on the day of charanjit singh channi oath ceremony

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य