वृत्तसंस्था
शिमला : हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर मात करून सत्ता खेचून घेतले असली तरी मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा मात्र थांबायला तयार नाही. काँग्रेस हायकमांडने हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखविंदर सिंग सुक्खू यांचे नाव पुढे आणत माजी मुख्यमंत्री कै. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी खासदार प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी हाय कमांड विरुद्धच जोरदार घोषणाबाजी केली आहे. प्रतिभा सिंह यांच्या समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हिमाचल प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक देखील लांबली आहे. Sukhwinder Singh Sukkhu came up in Himachal, Pratibha Singh supporters raised slogans against the Congress high command
काँग्रेस हायकमांडने पक्ष निरीक्षकांना शिमल्यात पाठवून काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतले. त्यानंतर आज दिवसभर राजकीय खल करून हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रचार प्रमुख सुखविंदर सिंग सुख यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले, पण हे समजताच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी सुक्खू-सुक्खू नही चलेगा, हायकमांड हाय हाय रानीसाहेबा जिंदाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या आहेत. इतकेच नाही, तर प्रतिभा सिंह यांचे समर्थक आमदार नाराज झाले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी वेगळी भूमिका घेतील का काय अशी भीती काँग्रेस हायकमांडच्या मनात आली आहे. त्यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक देखील नियोजित वेळेपेक्षा लांबणीवर पडत चालली आहे.
सुखविंदर सिंग सुख यांचे अधिकृत घोषणा काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री पदासाठी केली तरी काँग्रेस विधिमंडळ पक्ष हा एकजिनसी राहिलेला नाही. काँग्रेसने जरी विधानसभा निवडणुकीत 40 आमदार निवडून आणले आणून बहुमत प्राप्त केले असले तरी काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sukhwinder Singh Sukkhu came up in Himachal, Pratibha Singh supporters raised slogans against the Congress high command.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत
- रेल्वेत नोकरीची संधी; 2500 हून अधिक पदांवर भरती; ऑनलाईन करा अर्ज
- राज्यसभेत बहुमताने समान नागरी कायदा खासगी विधेयक सादर; विरोधकांचा सूर तीव्र
- हिमाचलात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची जोरात; केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणतात, इथे वाद नाही