विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्लीमधील तिहार जेलमध्ये कैद असताना सुकेश चंद्रशेखर याने एका महिलेला फसवून 200 करोड रुपये लंपास केले होते. तर याच सुकेशचे बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत देखील चांगले संबंध असल्याचे स्पष्ट होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही या दोघींना त्याने अनेक महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या होत्या असे म्हटले जात आहे.
Sukesh Chandrasekhar says, Jacqueline is lying
महागडी घड्याळे, महागडे कानातले, बॅगज, 15 लाखांचा घोडा, 9 लाखाचे एक मांजर, बांगडय़ा, शूज, मिनी कुपर कार हे सर्व गिफ्ट म्हणून सुकेशने जॅकलीनला भेट म्हणून दिली होते. तर सुकेशने जॅकलिनच्या आईला 1 लाख 80 हजार डॉलरची पोर्षं कारही भेट म्हणून दिली होती.
जॅकलिनने ईडीच्या चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनूसार, तिच्या बहिणीने सुकेश कडून 1 लाख 50 हजारांचे कर्ज घेतले होते. आणि सुकेशने तिचा भाऊ जो ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, त्याच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. असे तिने कबूल केले आहे. तर सुकेशने ईडीच्या चौकशी दरम्यान ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत असा दावा केला आहे.
सुकेश म्हणतो की, जॅकलिन खोटे बोलत आहे. मी असे कोणतेही पैसे ट्रान्सफर केलेले नाहीयेत. जॅकलिनच्या बँक अकाउंटमध्ये 1.80 लाख डॉलर मी पैसे ट्रान्सफर केले होते आणि तिच्या आईला मी बीएमडब्ल्यू भेट म्हणून दिली होती असा त्याने दावा केला आहे.
Sukesh Chandrasekhar says, Jacqueline is lying
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ