• Download App
    विरोधी ऐक्याच्या अशाही खुणा; एकमेकां विरोधातच पोलिसी चौकशीचा ससेमिरा!! Such signs of anti-unity; Sasemira of police investigation against each other

    AK v/s KV : विरोधी ऐक्याच्या अशाही खुणा; एकमेकां विरोधातच पोलिसी चौकशीचा ससेमिरा!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी सर्व नेते एकमेकांचे हात हातात धरत असतानाच पायात पाय घालत असल्याचेही विसंगत चित्र दिसू लागले आहे. मोदी विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतील एक विलक्षण साम्य समोर येत आहे, ते म्हणजे केंद्र सरकार जर आपल्या विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा लावत असेल तर आपणही आपल्या विरोधकांना मागे पोलिस चौकशीचा ससेमिरा लावायचा…!! Such signs of anti-unity; Sasemira of police investigation against each other

    मग विरोधक कोणीही असो त्याची पर्वा करायची नाही. महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार सरकारने केंद्र सरकारची खुन्नस म्हणून महाराष्ट्रात भाजपने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे, तसाच चौकशीचा ससेमिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या विरोधकांच्या मागे लावला आहे.

    कुमार विश्वास, अलका लांबा चौकशीच्या फेऱ्यात

    त्यातही दिल्लीचे पोलीस अरविंद केजरीवालांच्या हातात नाहीत. ते थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. पण आता पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची पूर्ण भगवंताची सत्ता आली आहे ना… पंजाब संपूर्ण पोलीस दल आम आदमी पार्टीच्या हातात आली त्यांची कार्यकक्षा ओलांडून पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा केजरीवालांनी आपल्या विरोधकांच्या मागे लावला आहे. केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास आणि काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांना पोलिस चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

    कुमार विश्वास आणि अलका लांबा हे दोघेही दिल्लीचे नेते आहेत. त्यांची चौकशी पंजाब पोलीस करणार आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचे खलिस्तानी फुटीरतावाद्यांशी कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. हे कलेक्शन कोणते आहे? कशाच्या आधारे हा आरोप केला होता? ही चौकशी करायला पंजाबचे पोलिस कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले होते. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असाच एफआयआर अलका लांबा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. अलका लांबा यांनी ट्विट करून केजरीवालांवर केजरीवाल यांच्या धोरणांवर शरसंधान साधले होते. त्यांच्याविरुद्ध रोपड पोलिसांनी एफआयआर दाखल करून त्यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

    भाजपचे नेते संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी एका संस्कृत काव्याद्वारे केजरीवाल यांच्या राजकीय वर्तणुकीचे वर्णन केले आहे ते सारांश रूपाने असे :

    आधीच मर्कट तशात ही मद्य प्याला
    झाला त्यात वृश्चिक दंशही तयाला
    झाली तयास तदनंतर भूतबाधा
    चेष्टा वदूं किती कपीच्या अगाधा

    – आप विरुद्ध काँग्रेस

    पण मध्ये एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते भाजप विरोधकांचे ऐक्य साधताना प्रादेशिक पक्षांचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांनी विरुद्धही धडक कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाहीत आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांविरुद्ध पोलिस चौकशीचा ससेमिरा लावताना मागेपुढे पाहणार नाहीत…!! हेच यातून स्पष्ट होत आहे. एक प्रकारे विरोधी ऐक्य साधताना विरोधकांचे हातात हात असले, तरी त्याच वेळी पायात पोलिसी चौकशीचे पायात पाय मात्र त्यांनी घातले आहेत. आता हे पायात पाय घातलेले विरोधी ऐक्य मोदींना कशी टक्कर देणार?? त्यासाठी प्रशांत किशोर यांची रणनीती कशी यशस्वी होणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Such signs of anti-unity; Sasemira of police investigation against each other

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!