• Download App
    विवाद से विश्वास योजनेचे यश, १.४८ लाख प्रकरणाचा निपटारा, ५४ टक्के रक्कम वसूल|Success of Vivad Se Vishwas Yojana, settlement of 1.48 lakh cases, recovery of 54%

    ‘विवाद से विश्वास’चे यश: १.४८ लाख प्रकरणांच्या निपटारांतून ५४ हजार कोटींचा थकलेला इन्कम टॅक्स वसूल

    करा संदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विवाद से विश्वास तक योजनेला मोठे यश मिळाले आहे. आत्तापर्यंत १.४८ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून यातून ५४ टक्के कराची वसूली झाली आहे.Success of Vivad Se Vishwas Yojana, settlement of 1.48 lakh cases, recovery of 54%


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : करा संदर्भातील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या विवाद से विश्वास तक योजनेला मोठे यश मिळाले आहे. आत्तापर्यंत १.४८ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून यातून ५४ टक्के कराची वसूली झाली आहे.

    केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे (सीबीटीटी) अध्यक्ष प्रमोद चंद्रा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी योजनेची घोषणा केली होती. यातून १.४८ लाख प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. त्याचबरोबर ५४ टक्के रक्कम कराच्या रुपाने वसूलही झाली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत होती.



    दीर्घकालीन चालणारे खटले कमी करणे, करदात्यांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्याचबरोबर कराच्या रुपाने उत्पन्न मिळविण्यासाठी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अभ्यासातून लक्षात आले की वादांमुळेच अनेक खटले रखडलेले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता वादाचे प्रसंग कमी करता येऊ शकतात.

    या योजनेअंतर्गत ३१ मार्चपर्यंत ज्या नागरिकांनी आपला कर मान्य केला आहे ते ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही दंडाशिवाय करभरणा करू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत १,३३,८३७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये १,४६,६९० प्रकरणे होती.

    सुमारे एक लाख चारशे सदोतीस कोटी रुपयांचा वाद होता. सरकारने या प्रकरणांचा निपटारा केल्याने ५४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी २०२० पर्यंत १९.५ लाख कोटी रुपयांचा कर प्रलंबित असलेले ५.१० लाख खटले प्रलंबित होते.

    Success of Vivad Se Vishwas Yojana, settlement of 1.48 lakh cases, recovery of 54%

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!