विशेष प्रतिनिधी
चेन्नई : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने त्रास दिल्याने कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली. तामीळनाडूतील भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेने धर्मांतराच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करून याबाबत एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.Student persecuted for refusing to convert to Christianity, Suicide by poisoning
बारावीच्या या मुलीने शाळेच्या वसतिगृहात कीटकनाशक प्राशन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या शाळेतील विद्यार्थी आणि मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने सात जानेवारी रोजी शाळेकडेअरियालूर जिल्ह्यात घरी जाण्यासाठी शाळेकडे परवानगी मागितली होती.
शाळेच्या अधिकाºयांनी १० जानेवारी रोजी घरी जाण्याची परवानगी नाकारली. इतर विद्यार्थी मात्र पोंगल सणासाठी घरी गेले होते. त्यामुळे या मुलीने कीटकनाशक प्राशन केले. दुसऱ्या दिवशी, ती घरी गेली आणि पोटदुखीची तक्रार केल्यानंतर 11 जानेवारी रोजी तिला घराजवळील स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले. तिला औषध दिले आणि ती त्याच दिवशी घरी परतली.
15 जानेवारी रोजी, वेदना वाढत गेली आणि तिला तंजावर वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तपासणीत तिच्या यकृताला गंभीर नुकसान झाल्याचे आढळले. बुधवारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. शाळेकडून या मुलीला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यासाठी तिचा छळही केला जात होता. त्यामुळे तिने किटकनाशक प्राशन केले.
Student persecuted for refusing to convert to Christianity, Suicide by poisoning
महत्त्वाच्या बातम्या
- कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न
- विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची
- 2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास होणार बनारस हिंदू विद्यापीठाचा उपक्रम
- रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ