प्रतिनिधी
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण रक्षणामध्ये भारताची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही जीवनशैली विकसित करण्यामध्ये देखील भारत आघाडी घेत आहे. त्यातूनच catch the rain या सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी जनतेला जोडण्याचे काम सुरू आहे. Strong steps to protect the environment: Accelerate the campaign to protect 13 major rivers in India !!
मार्च 2022 मध्ये देशातल्या 13 मोठ्या नद्यांच्या संरक्षणाचे महाअभियान सुरू झाले आहे. यामध्ये जल प्रदूषण कमी करण्याबरोबरच या नद्यांच्या किनाऱ्यावर वनांचा विकास करण्याचे कामही सुरू झाले आहे. यातून नदी किनाऱ्यांवरची जमिनीची धूप थांबून जल संरक्षण आणि संवर्धन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पर्यावरण दिन कार्यक्रमात सहभागी होताना याची तपशीलवार माहिती दिली आहे.
– नमामि गंगे, जमीन वाचवा, सौरऊर्जेवर भर
– देशात गेल्या 8 वर्षातल्या योजना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पर्यावरण संरक्षणाचा आणि संवर्धनाचा हेतू पूर्ण करत आहे. स्वच्छ भारत मिशन, waste to wealth शी संबंधित अनेक कार्यक्रम नमामि गंगे स्वच्छता अभियान ही त्याची पर्यावरणपूरक आणि जनतेच्या प्रयत्नातून अभियानाच्या यशस्वी त्याची उदाहरणे आहेत.
– जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बरड आणि नापीक झालेली जमीन पुनरुज्जीवन करण्यासाठी पर्यावरण पूरक योजना आखल्या आहेत.
– भारताने पर्यावरण दिनी एक महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, ती म्हणजे भारत आणि पेट्रोल मध्ये 10 % इथेनॉल ब्लेल्डिंगचे लक्ष पूर्ण केले आहे. यामुळे 26 % कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे , तर भारतीय शेतकऱ्यांच्या आमदनीत 40 % नी वाढ झाली आहे. 2014मध्ये पेट्रोलच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल बिल्डिंग चे प्रमाण 1% टक्का होते. निर्धारित वेळेत आधी 5 महिने भारताने 10 % इथेनॉल ब्लेंल्डिंगचे लक्ष पूर्ण केले आहे.
– भारताची सौर ऊर्जा क्षमता तब्बल 18 पटींनी वाढली आहे हायड्रोजन मिशन आणि सर्क्युलर इकॉनॉमिक पॉलिसीचे हे परिणाम आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी भारताची प्रतिबद्धता दृढमूल झाली आहे.
– भारताने installed Power Generation capacity का 40% non-fossil-fuel based sources लक्ष निर्धारित केले होते हे लक्ष्य देशाने ठरविलेल्या वेळेपेक्षा 9 वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
– भारताने 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर पडीक – नापिक जमीन पुन्हा सुपीक करण्याचा निर्धार केला आहे त्यादृष्टीने काम सुरू आहे. शेतीमध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि अवजारे वापराचा सरकारचा प्रयत्न आहे. सौर उर्जेवर आधारित अवजारे उत्पादनाचाही सरकार विचार करत आहे.
– गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन नैसर्गिक शेतीचा मोठा कॉरिडोर बनविण्यासाठी केंद्रीय बजेट मध्ये तरतूद केली आहे. गंगेच्या किनाऱ्यावरील गावांमधील शेती पूर्णपणे रसायनमुक्त असेल. त्याची संपूर्ण अर्थरचना निसर्गावर केंद्रित आणि आधारित असेल. यामुळे नमामि गंगे सारख्या अभियानाला देखील मोठे बळ प्राप्त होणार आहे.
Strong steps to protect the environment: Accelerate the campaign to protect 13 major rivers in India !!
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात भीषण दुर्घटना, चितगाव येथील कंटेनर डेपोला आग; 33 ठार, 450 हून अधिक जखमी
- 5 जून : पर्यावरण रक्षणात भारत अग्रेसर कसा आणि कुठे??; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसूत्रे!!
- Indian Wheat Export : तुर्कस्तानानंतर आता इजिप्तमध्ये भारतीय गव्हाची ‘नो एंट्री’, सडलेला म्हणत परत केला
- 5 जूनचा राज ठाकरेंचा वादा; अयोध्येत पोहोचले मनसेचे अविनाश दादा!!
- संजय राऊत म्हणाले- आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात राजकीय अजेंडा नाही, काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावरून केंद्रावर आरोप