विशेष प्रतिनिधी
गाझीपूर : चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेपासून डॉक्टर, इंजिनिअरपर्यंतची अनेक क्षेत्रे खुणावत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील बुलंदशहर येथील 15 वर्षीय कुमार विश्वास सिंहने पाच विषयांमध्ये १०० टक्के गुण मिळवूनही लष्करात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.Strong salute: Kumar Vishwas Singh, who scored 100% marks in five subjects in 10th class, wants to join Army
कुमार विश्वास सिंह याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 10 वीच्या परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवले. मंगळवारी निकाल जाहीर झाले. यामध्ये बुलंदशहरमधील विद्याज्ञान शाळेचा विद्यार्थी असलेल्य कुमारला इंग्रजी, हिंदी, गणित, सामाजिक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले.
कुमार म्हणाला की कोरोना महामारीमुळे शाळेतील शिक्षण बंद होते. मात्र, मी तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला. शिक्षकांनीही माझ्या सर्व शंका ऑनलाइन दूर केल्या. हे सोपे नव्हते. पण पालक आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने मी ते करू शकलो.
दहावीत शंभर टक्के गुण मिळालेल्या कुमारला लष्करी सेवेची आवड आहे. वीरांच्या कहाण्या त्याला नेहमीच प्रेरित करतात. त्यामुळेच देशसेवेसाठी त्याला लष्करात जायचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेशाची तयारी करत आहे.
आपल्या शाळेबद्दल बोलताना कुमार म्हणाला, विद्याज्ञान ही अत्यंत चांगली शाळा आहे. उच्च दर्जाचे शिक्षण येथे विनामूल्य आहे. शिक्षक खूप मेहनती आहेत. मला सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत.
Strong salute: Kumar Vishwas Singh, who scored 100% marks in five subjects in 10th class, wants to join Army
महत्त्वाच्या बातम्या
- हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानवाद्यांकडून धमक्या, पण फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज असल्याचे खट्टर यांनी ठणकावले
- धमकाविण्याची फॅशन योग्य नाही, संसदेत निर्मला सीतारामन यांनी खासदारांना सुनावले
- करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली
- लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा